मानखुर्द (मुंबई) येथे शहीद भगतसिंह पुस्तकालयाचे उद्घाटन
आपल्या समृद्ध देशातील बहुसंख्य जनता आजसुद्धा गरीबी, बेरोजगारी आणि भुकेची बळी ठरते आहे कारण संसाधनांवर काही मूठभर भांडवलदार मांड ठोकून बसले आहेत. ते आपल्या नफ्यासाठी कष्टकऱ्यांना दिवसरात्र राबवत असतात. आज टीव्ही, सिनेमा उद्योग, इंटरनेटपासून सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे लहान मुले व तरुणांना स्वार्थी, हिंसक आणि विकृत बनवणाऱ्या गोष्टी मनोरंजनाच्या नावाखाली देत आहेत. यामुळे समाजात वेगवेगळ्या विकृती, अंधविश्वास पसरत आहेत. या नफेखोर व्यवस्थेला पर्याय उभा करण्याच्या दीर्घ लढ्यासाठी तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि समृद्ध असणे गरजेचे आहे. निरोगी मनोरंजनाबरोबरच लहान मुले व तरुणांमध्ये उच्च जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. म्हणूनच , वैज्ञानिक विचार देणारी तसेच सामान्य लोकांच्या आयुष्याचे वास्तव व परिवर्तनाचा मार्ग यांच्याशी वाचकांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे.