Category Archives: घडामोडी

23 मार्च शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी संघटनांकडून देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन

आज आपल्याला विविध मार्गांनी आपल्या शहीद क्रांतिकारकांचा वारसा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जावा लागेल. शहीदांच्या स्वप्नातला भारत अजूनही बनलेला नाहीये. आपल्या देशात जो कामगार कष्टकरी वर्ग त्याच्या मेहनतीने या देशाला चालवतो तो दोन वेळेच्या अन्नाला सुद्धा मोताद आहे. त्याला ना राहायला चांगले घर आहे, जेवायला अन्न ना शिक्षण. याच वर्गाच्या श्रमाची लूट करून या देशातला अंबानी-अडाणी सारखे बडे भांडवलदार आणि भांडवलदार वर्गाचे सर्व हिस्से  दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत. आज कामगार कष्टकऱ्यांमध्येच धर्म आणि जातीच्या नावाने फूट पाडण्याचे काम केले जात आहे. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर आज भारताला शासक वर्ग खूप चतुराईने करत आहे. अशा वेळेस या सर्व  क्रांतिकारकांनी जो संदेश दिला होता तो आपल्याला प्रत्येक वस्तीपर्यंत, कारखान्यापर्यंत पोहोचवावाच लागेल. म्हणून आज गरज आहे ती या देशातल्या युवकांनी कामगार कष्टकऱ्यांनी संघटीत होण्याची.  तेव्हाच आपण क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत बनवू शकू.

8 मार्च 2025, आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिनानिमित्त स्त्री मुक्ती लीग तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

8 मार्चचा खरा कामगार वर्गीय संघर्षाचा इतिहास जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि त्यासोबतच पुढच्या संघर्षांचा संकल्प घेण्यासाठी स्त्री मुक्ती लीग तर्फे 8 मार्च 2025 रोजी मुंबई आणि पुण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आले. विविध कामगार वस्त्यांमधून रॅली मार्गक्रमण करत होती, आणि यावेळी “आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन” अशा 20व्या शतकातील घोषणांना उजाळा देण्यात आला, ज्या काळात लाखोंच्या संख्येने कामगार व न्यायप्रिय नागरिक आपल्या हक्क-अधिकारांसाठी रस्त्यावर उतरले होते आणि महिलांनी त्या चळवळीत पुढाकाराची भूमिका बजावली होती. या दोन्ही रॅलींमध्ये महिला आणि पुरुष दोघांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

6 महिन्यांच्या वांशिक संघर्षानंतर दुभंगलेल मणिपूर: भाजपच्या जातीयवादी राजकारणाची परिणती

संपूर्ण अशांतता आणि जातीय कलहात आज दोन भागात विभागलेल्या मणिपूरमधील संकटाचे मूळ कारण म्हणजे सत्ताधारी भाजपचे विभाजनाचे आणि द्वेषाचे राजकारण, कायद्याच्या उघड उल्लंघनाविरुद्ध संपूर्ण निष्क्रियता, मेईतेई समुदायाच्या सांप्रदायिक गटांद्वारे केलेल्या हिंसाचारात सरकारचा सहभाग, म्हणजेच ‘फूट पाडा आणि राज्य करा’चे राजकारण.

स्त्री मुक्ती लीग तर्फे मानखुर्द, मुंबई येथे ‘मुक्ती चे स्वर’ वाचनालयाचे उद्घाटन!!

स्त्री मुक्ती लीग तर्फे मानखुर्द, मुंबई येथे ‘मुक्ती चे स्वर’ वाचनालयाचे उद्घाटन!! भांडवली पितृसत्तेविरोधात एकजूट होऊन लढण्याचे केले आवाहन! ✍ बिगुल पत्रकार गेली काही वर्षे स्त्री मुक्ती लीग मुंबईतील मानखुर्द-गोवंडी…

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि धर्मवादाच्या विरोधात भगतसिंह जनअधिकार यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण

12 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान देशाच्या 11 राज्यांमध्ये  भगतसिंह जनअधिकार यात्रा आयोजित केली गेली. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना, स्त्री मुक्ती लीग, महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन व इतर अनेक जनसंघटनांच्या वतीने ही यात्रा आयोजित केली गेली. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, बिहार, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण, चंडीगढ, आणि राजस्थानतील विविध शहरांमध्ये ही यात्रा  कामकरी जनतेपर्यंत पोहोचली. 15 एप्रिल रोजी यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

शहीद चंद्रशेखर आझाद आणि शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

आज खऱ्या अर्थाने सर्वहारा वर्गाला संघटीत करायचे असेल तर जुन्या समाजव्यवस्थेवर आधारित अप्रासंगिक धार्मिक सणांच्या जागी जनतेच्या नायकांचे जन्मदिन-शहीददिन, जनतेने लढलेल्या योग्य लढाया हे सामुहिक सण म्हणून स्थापित करावे लागतील. भगतसिंहाने सांगितल्याप्रमाणे क्रांतीचा संदेश गिरण्या-कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांमध्ये पोहोचवून त्यांच्यात क्रांतीची चेतना जागवावी लागेल.

आपल्या वाट्याचे आकाश परत मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?

सावित्री-फातिमाचे स्वप्न जपत, सावित्री-फातिमा यांच्या क्रांतिकारी मैत्रीच्या वारशाचे स्वतःला मशाल वाहक मानणारी ‘स्त्री मुक्ती लीग’ भांडवली चौकटीला आह्वान देत स्त्री-मुक्तीच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे.

136वा कामगार दिन देशभरात क्रांतिकारी कामगारवर्गाकडून साजरा

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मे दिवसाचा वारसा स्मरून देशभरात क्रांतिकारी कामगार संघटनांनी कामगारांच्या एकजुटीचे प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

नौजवान भारत सभेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन संपन्न!

क्रांतिकारक शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल, अश्फाक सारख्या क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या नौजवान भारत सभा या युवक क्रांतिकारी संघटनेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन 23 मार्च 2022 रोजी, शहीद दिनानिमित्त पुणे शहरात संपन्न झाले.

आंदोलनाचा परिणाम: बांधकाम कामगारांच्या रखडलेल्या नोंदण्या पुन्हा चालू!

आंदोलनाचा परिणाम: बांधकाम कामगारांच्या रखडलेल्या नोंदण्या पुन्हा चालू! महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या नेतृत्वात बांधकाम कामगार होताहेत संघटित! बिगुल पत्रकार महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनतर्फे 31 ऑगस्ट 2020 रोजी केलेल्या आंदोलनाच्या परिणामी…