Tag Archives: विराट

दक्षिण कोरियाच्या सांगयोंग कार कंपनी कामगारांचा झुंजार संघर्ष

दक्षिण कोरियाच्या सांगयोंग मोटर्स या कार कंपनीचे कामगार गेल्या ७ वर्षांपासून एक शानदार लढा देत आहेत. या सात वर्षांत त्यांनी सियोल शहरापाशी असलेल्या प्योंगतेक कारखान्यावर ७७ दिवस कब्जासुद्धा केला, राज्यसत्तेचे भयंकर दमन सोसले, कित्येक वेळा पराभवाला तोंड दिले मात्र आजसुद्धा ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दमन दुष्टचक्रात अडकून २००९ पासून आत्तापर्यंत २८ कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा ते मृत्यूमुखी पडले आहेत. तसे पाहता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कामगार संघर्ष करत असतील तर तो संघर्ष फक्त त्यांचा राहत नाही, तर अवघ्या कामगार वर्गाचाच तो लढा असतो. सांगयोंग मोटर्सच्या कामगारांच्या सोबत उभे राहून भारतातील कामगार तर या संघर्षांत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात.

भांडवली शेती, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या

या व्यवस्थेच्या अंतर्गत दुष्काळाचा पक्का उपाय अशक्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आज कोणत्याही प्रदेशातील शेतीवरील संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होत नाही व श्रीमंत वर्गाला वास्तविक यातून फायदाच होतो कारण स्वस्त श्रम त्यांच्यासाठी उपलब्ध होतो. तिसरी गोष्ट, दुष्काळग्रस्त भागांत सर्वच वर्गातील लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी वेगवेगळ्या वर्गांवर यांचा परिणाम वेगवेगळा असतो. शेतमजुरांनाच सर्वांत जास्त नुकसान झेलावे लागते. लहान आणि मध्यम शेतकरी उद्ध्वस्त होऊन सर्वहारा वर्गात सामील होण्याची गती दुष्काळामुळे वाढते व कोणताही उपाय ही बरबादी थांबवण्यासाठी कुचकामी ठरतो. चौथी गोष्ट, दुष्काळाच्या समस्येचे निदान झाले म्हणून शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या दूर होत नाहीत, व दुष्काळ हे आत्महत्यांचे एकमेव कारण आहे असे समजणे चुकीचे आहे.

जगातील सर्वात मोठा युद्ध गुन्हेगार – संयुक्त राज्य अमेरिका

‘दहशतवादाविरुद्ध लढाई’च्या नावाखाली अमेरिकेने जगभरात जेवढी युद्धे छेडली आहेत, व त्यातून अमेरिकेला जो नफा होतो त्याचे मोजमाप करणेसुद्धा अवघड आहे. जगात युद्धे सुरु ठेवणे हे अमेरिकेला त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. महाशक्ति बनल्यानंतर जी असंख्य युद्धे अमेरिकेने जगातील जनतेवर लादली त्यातून अमेरिकेचा प्रचंड फायदा झाला, पण हेसुद्धा सत्य आहे की जनतेच्या अदम्य प्रतिकारासमोर अमेरिकेला नेहमीच पराभव पत्करावा लागला. १९५५ मध्ये अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर साम्राज्यवादी युद्ध लादले त्यावेळी अमेरिकाला तिच्या सैन्य शक्तीचा प्रचंड अभिमान होता. परंतु लवकरच तिला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या सैन्य शक्तीपेक्षाही झुंझार कष्टकरी जनतेची ताकत जास्त आहे. २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अमेरिकेने अमानवीय युद्ध अपराध केले. व्हिएतनामवर कार्पेट बॉम्बिंग केली गेली आणि संपूर्ण युद्धात तब्बल ४० लाख व्हिएतनामी नागरिकांना जीव गमवावा लागला. परंतु जनतेच्या अभूतपूर्व संघर्षापुढे अमेरिका टिकू शकली नाही आणि शेवटी ह्या युद्धात तिचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. तत्पूर्वी, १९५३ मध्ये उत्तर कोरियाने सुद्धा जनतेच्या अदम्य साहसाचे दर्शन घडवीत अमेरिकेला पाणी पाजले होते.

महाराष्ट्रातील सरकारकडून चांगल्या दिवसांची भेट

सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावरून सरकार नेमका कशा प्रकारचा महाराष्ट्र घडवू पाहत आहे, कोणासाठी काम करते आहे आणि सरकार कोणाचे शत्रू आहे, ते दिसून आले आहे. बीफवर बंदी आणि श्रम कायद्यांमध्ये फेरबदल तर सरकारने याधीच केलेले आहेत. आता २७ ऑगस्ट रोजी सरकारने एक नवीन परिपत्रक करून सरकारवर टीका करणाऱ्या कोणालाही देशद्रोही घोषित करून तुरुंगात डांबण्याची तरतूदही करून ठेवली आहे. जैन समुदायाचा उत्सव प्रयुषणच्या दिवसांमध्ये अलीकडेच सरकारने मुंबईत चार दिवस आणि मीरा भायंदरमध्ये आठ दिवस कोणत्याही प्रकारच्या मांसविक्रीवर (मासे सोडून) बंदी घातली होती.