Tag Archives: आशय

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक: सर्वाधिक विकसित भांडवली देशातील “विकसित” प्रचारतंत्राचा तमाशा

ट्रंप जिंकून येवो वा हॅरीस, अमेरिकन कामगार वर्गाच्या जीवनात कोणताही मूलभूत फरक पडणार नाही.  अमेरिकेतील कामगार वर्गाच्या चळवळीची स्थिती आज खूप दयनीय आहे.  तेथे युनियन सदस्यता खूप कमी आहे, वेतन वाढीचे लढे सुद्धा फारसे होताना दिसत नाहीत. 2018 मध्ये शिक्षकांनी वेग-वेगळ्या राज्यांमध्ये संप पुकारला, आणि थोडे फार विजय सुद्धा झाला; पण त्यात एक स्वतःस्फूर्तता होती.; संघटित आणि योजनाबद्ध पद्धतीने राजकीय मागण्या घेऊन लढाया लढणे अजून अमेरिकेचा कामगार वर्ग करत दिसत नाही; याचे मुख्य कारण म्हणजे एका खऱ्या क्रांतिकारी कामगार पक्षाचा अभाव.

ऋषी सुनाक: युकेचा पहिला “गुंतवणूक बॅंकर” प्रधानमंत्री

ऋषी सुनाक हा युके(युनायटेड किंग्डम)चा पहिला “हिंदू” अथवा “भारतीय मूळाचा” अथवा “आशियाई” प्रधानमंत्री असल्याबद्दल हिंदुत्ववादी प्रसारमाध्यमे, भारतातील वा जगातील इतर प्रसारमाध्यमे प्रचार करत आहेत. एक गोष्ट जिच्यावर ते जोर देत नाहीयेत, आणि जी खरी महत्त्वाची गोष्ट आहे ती ही की ऋषी सुनाक हा युकेचा पहिला इन्व्हेस्टमेंट बॅंकर (गुंतवणुक संदर्भात सल्ला देणारा तज्ञ) प्रधानमंत्री आहे.

शिवसेनेच्या कामगारद्रोही इतिहासाला विसरू नका!

स्वत:ला मराठी माणसांचा, हिंदूंचा कैवारी म्हणणाऱ्या शिवसेनेचा स्थापनेपासूनचा संपूर्ण इतिहासच कामगारद्रोहाचा इतिहास आहे. वरवर मराठी कामगारांच्या हिताच्या थापा मारणाऱ्या या पक्षाने सतत सर्व कामगारांच्या हितांवर हल्ला करत बिल्डर-उद्योगपतींचे हित जपले आहे.