Tag Archives: कविता कृष्णपल्लवी

फॅसिझमची मुलभूत समजदारी विकसित करा आणि पुढे येऊन आपली जबाबदारी उचला

फॅसिझमचा विरोध करणारे अनेक बुद्धिजीवी आणि विविध संघटनांमध्येसुद्धा फॅसिझम संदर्भात अनेक प्रकारचे भ्रम आहेत. कविता कृष्णपल्लवी यांची खालील टिप्पणी आपल्याला हे समजायला मदत करते की फॅसिझम एक सामाजिक आंदोलन आहे, ज्याची मूळे भारतीय समाजात खोलवर गेलेली आहेत. याला केवळ निवडणुकीत हरवून पराजित किंवा नेस्तनाबूत केले जाऊ शकत नाही. त्याविरुद्ध एका लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी करावी लागेल. ही टिप्पणी मोदी सत्तेत येण्याच्या आधी लिहिली गेली होती परंतु आज ती अजूनच जास्त प्रासंगिक आहे.

कविता: चेटकिणी

कविता: चेटकिणी कविता कृष्णपल्लवी (भाषांतर: गणेश विसपुते) चेटकिणी खूप हसतात निलाजऱ्या आणि जिद्दी असतात अत्यंत बडबड्या असतात अन् प्रत्येक मुद्यावर वाद घालत राहतात न थकता. चेटकिणी आपल्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय…

गाझापट्टीतील एका चिमुकल्याची कविता / कविता कृष्णपल्लवी

बाबा!
मी पळू शकत नाहीये
रक्ताळलेल्या मातीने बरबटलेले माझे बूट
फारच जड झालेयत
माझे डोळे आंधळे होताहेत
आकाशातून बरसणार्‍या आगीच्या चमचमाटाने
बाबा,
माझे हे हात आता दगड दूरपर्यंत फेकू शकत नाहीत
आणि माझे पंखसुद्धा अद्याप खूप लहान आहेत

कविता – बायांनो ! बोला! / कविता कृष्णपल्लवी

बायांनो ! बोला!
कष्टाच्या दुहेरी बोजाने, थकून दमलेल्या
उदास-निराश सर्व बायांनो! बोला!
खुल्या कंठाने बोला !

कविता – चेटकिणी / कविता कृष्णपल्लवी

चेटकिणी खूप हसतात
निलाजऱ्या आणि जिद्दी असतात
अत्यंत बडबड्या असतात अन् प्रत्येक मुद्यावर
वाद घालत राहतात न थकता.

सामाजिक न्यायाच्या ‘झेंडेकऱ्यांचा’ खरा चेहरा

हे सर्व पक्ष (स्थानिक) भांडवलदार, धनिक शेतकरी-उच्चमध्यमवर्गीय शेतकरी (कुलक-फार्मर) वर्गाचे पक्ष आहेत. हे वर्ग आपल्या हितांच्या रक्षणासाठी ना फक्त मोठ्या (एकाधिकारी) भांडवलदारांशी लढतात, तर आपापसातही वरकड मूल्याच्या वाटणीसाठी लढत राहतात. त्यामुळे त्यांची एकता नेहमीच तात्पुरती असते. मोठ्या भांडवलदारांच्या एका गटाला सोबत घेऊन हे पक्ष तथाकथित तिसरी आघाडी तर बनवतात परंतू लवकरच स्वत:च्या अंतरविरोधांमुळे या आघाडीची बिघाडी होते. भारतात तिसऱ्या आघाडीचे राजकारण कधीच टिकू शकत नाही.

कविता – विदूषक / कविता कृष्णपल्लवी

विदूषक सिंहासनावर बसून
दाखवतो तऱ्हेतऱ्हेच्या करामती
दरबारी हसतात, टाळ्या पिटतात
आणि भ्यायलेले सभ्य नागरिक साथ देतात
त्यांना माहीतीय, विदुषक एक खुनी आहे
आणि दरबारात रक्ताच्या डागावरच
अंथरल्यात लाल पायघड्या
विदूषकाचा आवडता छंद आहे