परिचय
‘कामगार बिगुल’चे स्वरूप, उद्देश आणि जबाबदाऱ्या
- ‘कामगार बिगुल’ व्यापक कष्टकरी जनतेमध्ये क्रांतिकारी राजकीय शिक्षक व प्रचारकाची भूमिका पार पाडेल. हे वृत्तपत्र कामगारांमध्ये क्रांतिकारी वैज्ञानिक विचारधारेचा प्रचार करेल आणि खऱ्याखुऱ्या सर्वहारा संस्कृतीचा वाहक बनेल. हे वृत्तपत्र जगभरातील क्रांतींचा इतिहास आणि त्यांच्यातून घ्यावयाचे शिक्षण, आपल्या देशातील वर्ग संघर्ष, कामगार चळवळीचा इतिहास आणि त्यातून घ्यावयाचे धडे यांच्याशी कामगार वर्गाला परिचित करेल. त्याच बरोबर समस्त भांडवली अफवा-दुष्प्रचारांचा भांडाफोड करेल.
- ‘कामगार बिगुल’ भारतीय क्रांतीचे स्वरूप, मार्ग आणि समस्यांविषयी क्रांतिकारी कम्युनिस्टांमध्ये चालणाऱ्या विविध चर्चा नियमित रुपात छापेल आणि देश-विदेशातील राजकीय घटना आणि आर्थिक परिस्थितीचे योग्य विश्लेषण मांडून कामगार वर्गाला शिक्षित करण्याचे काम करेल.
- ‘कामगार बिगुल’ स्वतः अश्या चर्चा चालवेल जेणे करून कामगारांचे राजकीय शिक्षण होईल. तसेच त्यांच्यामध्ये योग्य लाइनची समज विकसित होऊन ते क्रांतिकारी पार्टी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यातून व्यवहारामध्ये योग्य लाइनच्या सत्यापानचा आधार तयार होऊ शकेल.
- ‘कामगार बिगुल’ कामगार वर्गामध्ये राजकीय प्रचार आणि शिक्षणाचे कार्य चालवत सर्वहारा क्रांतीच्या ऐतिहासिक जबाबदारीशी त्याला परिचित करेल, त्याला आर्थिक संघर्षांसोबतच त्याच्या राजकीय अधिकारांसाठी लढायला शिकवेल, चार आणे-आठ आण्याच्या किरकोळ आर्थिक लढायांमध्ये कामगारांना अडकावून टाकणाऱ्या नकली कम्युनिस्टांपासून आणि भांडवली राजकीय पक्षांचे शेपूट असलेल्या किंवा व्यक्तिवादी-अराजकतावादी ट्रेड युनियन्स पासून सावध करत त्याला हरतऱ्हेच्या अर्थवाद व सुधारवादाविरुद्ध लढायला शिकवेल, त्याच बरोबर त्याच्यात सच्ची क्रांतिकारी चेतना निर्माण करेल. ‘कामगार बिगुल’ सर्वहारा वर्गाच्या फळ्यांमधून क्रांतीकारकांची भरती करण्याच्या कामात सहाय्यक बनेल.
- ‘कामगार बिगुल’ हे वृत्तपत्र कामगार वर्गाचा क्रांतिकारी शिक्षक, प्रचारक आणि आवाहनकर्ता ह्या भूमिकांबरोबरच क्रांतिकारी संघटनकर्ता व आंदोलनकर्त्याची भूमिका सुद्धा पार पाडेल.
Revival of socialism…