19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या सिनेमाच्या उदयापासून आजपर्यंत तो कधीही तत्कालीन राजकारणापासून वेगळा राहिलेला नाही. त्या त्या देशातील सत्ताधारी वर्ग सिनेमाचा उपयोग आपल्या विचारधारेचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी करत असतो. भारतात फॅशिझम सत्तेत आल्यानंतर गेल्या 10 वर्षांतील अनेक, आणि तात्कालिकरित्या बघायचे झाले तर नजिकच्या काळात प्रदर्शित झालेले—काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, रामसेतू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सम्राट पृथ्वीराज, आर्टीकल 370, धर्मवीर, शेर शिवराज, मै अटल हूॅं, आदिपुरुष, शेरशाह, अटॅक, मेजर, आणि असे अनेक—मोठ्या बजेटचे सिनेमे हिंदुत्व आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकीय प्रचारासाठी आणि हिंदुत्वाचे राजकारण जनतेत मुरवण्यासाठी बनवले जात आहेत.