Tag Archives: संघ

स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक शहिदांच्या नजरेतून रा.स्व.संघांची काळी कृत्ये – “भयानक कट”

“सांप्रदायिक तणावाचा उन्माद अतिशय जोरदारपणे आकार घेत होता, त्याच काळात वेस्टर्न रेंजचे डेप्युटी इंस्पेक्टर बी. बी. एल. जेटली जे अतिशय मुरलेले-मुत्सद्दी आणि सुयोग्य पोलीस अधिकारी होते, ते अत्यंत गुप्तपणे माझ्या घरी आले. त्यांच्यासोबत आणखी दोन पोलीस अधिकारी आले होते, त्यांच्याकडे कुलुपबंद  दोन मोठ्या ट्रंका होत्या. जेंव्हा त्या ट्रंका उघडल्या गेल्या, तेव्हा राज्यातल्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये सांप्रदायिक आधारावर नरसंहार करण्याचा कट समोर आला. त्या ट्रंका जेव्हा उघडल्या तेव्हा त्या प्रांतातील सर्व पश्चिमी जिल्ह्यांमधील प्रत्येक शहर, गावांचे नकाशे समोर आले, ज्यात चूक होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. ते सर्व नकाशे पद्धतशीरपणे तयार करण्यात आले होते. त्या नकाशांवर मुस्लीम बहुल वस्त्या, गल्ल्या आणि मुसलमान लोकांच्या विभागांवर मोठमोठ्या खुणा करण्यात आल्या होत्या. या सर्व वेगवेगळ्या खुणा केलेल्या ठिकाणी कसे पोहचावे या आणि अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे निर्देश करणारे दस्तावेज तयार करण्यात आले होते. हे सर्व त्यांच्या महाअनर्थकारी उद्देशावर प्रकाश टाकत होते.”

“गोमाते”च्या नावाने हत्याकांडांचे सत्र

मुस्लिमांचा जाहीर तिरस्कार करणाऱ्या मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील फॅसिस्ट हिंदुत्ववादी गोभक्तांचा हैदोस वाढला असून गोरक्षणाच्या नावाने गुंड टोळ्य़ांकडून बेमुर्वतपणे निर्दोष लोकांच्या, विशेषत: दलित आणि मुस्लिमांच्या हत्या केल्या जात आहेत.

सावधान! सावधान! सावधान! गुंगीचे विषारी खुराक चारणाऱ्या टोळीपासून सावधान…!!!

पूर्वी या टोळीला ‘चड्डी गॅंग’ किंवा ‘चड्डीबनियान टोळी’ या नावाने ओळखले जात होते. पण आता विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की यांनी चड्डीच्या ऐवजी ‘विजार’ वापरण्यास सुरुवात केली आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेला सावधान करण्यात येत आहे की, नवीन पॅकिंग बघून धोका खाऊ नका, कारण आतला माल जुनाच आहे!

गोरक्षणाचे गौडबंगाल – फासीवादाचा खरा चेहरा

एका बाजूला भाजपने कायदेशीर रूपाने कट्टरतावादी शक्तींसाठी संघटीत हिंसेचे दरवाजे उघडले आहेत आणि दुसरीकडे आर.एस.एस. आणि या सर्व फासिस्त शक्ती अनेक प्रकारच्या कॅडर-आधारित यंत्रणा, मीडिया आणि आपल्या प्रचार तंत्राद्वारे तळागाळातील स्तरावर सतत लोकांमध्ये एका ‘खोट्या चेतनेची’निर्मिती करत आहेत, जी जमावाच्या स्वरूपात हिंसेचे खेळ खेळत आहे. ‘पवित्र गाईच्या’बाबतीत अशाच अनेक खोट्या गोष्टींचा प्रचार संघ जागोजागी करत आहे. उदाहरणार्थ की सर्व हिंदू गोहत्येच्या आणि गोमांस खाण्याच्या विरोधात आहेत किंवा हिंदू संस्कृती आणि परंपरेने गोहत्येला अपवित्र मानले आहे. ही गोष्ट खरी आहे की हिंदूंमध्ये काही जाती आणि समुदाय गाईला पूज्य आणि गोहत्येला निकृष्ठ मानतात पण हे सुद्धा खरे आहे की भारतातील सर्व हिंदू समुदायांचे किंवा जातींचे आजच्या किंवा अगोदरच्या काळात असे मत नव्हते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशाचा स्वातंत्र्यलढा

आज संघाने राष्ट्रप्रेमाच्या कितीही बाता मारल्या तरी त्यांचा खरा काळाकुट्ट भूतकाळ इतिहासाने संघाच्याच साहित्यातून जपून ठेवला आहे. हाफ पॅंट सोडून फूल पॅंट वापरली म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला नंगेपणा झाकता येणार नाही.