उजव्या विचाराचे एन्फ्ल्युएंसर्स (प्रभावक): फॅशिस्ट विखारी प्रचाराची महामारी
भांडवलशाही व्यवस्थेत जगण्याच्या असुरक्षिततेमुळे निर्माण झालेल्या एकाकीपणाच्या शून्यतेवर मात करण्यासाठी दिवसभर मोबाईलवर स्क्रोल करणारे लोक त्यात येणारी निरर्थक सामग्री, खाद्यपदार्थ आणि मांजरीचे व्हिडिओ आणि प्रभावक व कंप्युटर द्वारे निर्मित द्वेषाने भरलेल्या उजव्या विचाराच्या सामग्रीला जवळ करतात. एकटेपणावर मात करण्यासाठी इंटरनेट हा एक आधार बनला आहे.