कामगार वर्गाचे महान शिक्षक लेनिन यांच्या जन्मदिना निमित्त त्यांची काही उद्धरणे
क्रान्तिकारी सिध्दांताशिवाय कोणतीही क्रान्ति होऊ शकत नाही
क्रान्तिकारी सिध्दांताशिवाय कोणतीही क्रान्ति होऊ शकत नाही
“खूपच थोडे पती, सर्वहारा वर्गाचे पतीसुद्धा यात सामील आहेत, जे विचार करतात की जर त्यांनी या ‘महिलांच्या कामात’ हातभार लावला, तर ते त्यांच्या पत्नींवरचे ओझे आणि चिंता किती कमी करू शकतात, किंवा ते त्यांना पूर्णत: भारमुक्त करू शकतात. पण नाही, हे तर ‘पतीच्या विशेषाधिकारांच्या आणि प्रतिष्ठेच्या’ विरोधात जाईल. त्याची मागणी आहे की त्याला आराम आणि निवांतपणा पाहिजे. महिलेच्या घरेलू जीवनाचा अर्थ आहे एक हजार किरकोळ कामांमध्ये आपल्या ‘स्व’चे सतत बलिदान देत राहणे. तिच्या पतीचे, तिच्या मालकाचे, परंपरागत अधिकार टिकून राहतात, आणि त्यांच्यावर लक्षही जात नाही. वस्तुगतरित्या, त्याची दासी बदला घेत असते, छुप्या रुपात सुद्धा. तिचे मागासलेपण आणि आपल्या पतीच्या क्रांतिकारी आदर्शांच्या समजदारीचा अभाव पुरूषाच्या झुंझार भावनेला आणि संघर्षाप्रती दृढनिश्चयाला मागे ओढण्याचेच काम करतात. या गोष्टी वाळवीसारख्या, अदॄश्य रूपाने, हळूहळू पण निश्चितपणे आपले काम करत राहतात.
माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, व जगाला जगवतात. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्याला विद्रूप करणं मला आवडत नाही.
लेनिन वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात,
ते होते आमचे शिक्षक.
ते लढत राहिले आमच्या सोबत.
ते वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात.
एका बाजूला संपत्ती व चैन वाढत आहे, आणि तरीही आपल्या श्रमाने जे लोक ही सर्व संपत्ती निर्माण करतात अशा लक्षावधी लोकांना दारिद्र्यात व दैन्यात जिणे कंठावे लागत आहे. शेतकरी उपासमालेनिनरीने मरत आहेत, कामगार बेकार होऊन वणवण फिरत आहेत, आणि तरीही व्यापारी लाखो पोती धान्य रशियातून परदेशी निर्यात करीत आहेत, माल विकता येत नाही, मालाला बाजारपेठ उरलेली नाही म्हणून फॅक्टऱ्यांमधले कामकाज थंडावले आहे.