Tag Archives: भगतसिंह

उद्धरण – कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020

माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, व जगाला जगवतात. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्याला विद्रूप करणं मला आवडत नाही.

उद्धरण / कामगार बिगुल, जानेवारी 2020

“जर देशप्रेमाची व्याख्या सरकारची अंध आज्ञाधारकता नसेल, झेंडा आणि राष्ट्रगीताची भक्तिभावाने पूजा करणे नसेल; उलट आपल्या देशावर, आपल्या साथी नागरिकांवर (सर्व जगातील) प्रेम करणे असेल, न्याय आणि लोकशाहीच्या तत्वांशी एकनिष्ठता असेल; तर खऱ्या देशप्रेमासाठी आवश्यक आहे की जेव्हा आपले सरकार त्या तत्वांना पाळणार नाही, तेव्हा आपण त्या सरकारचा हुकूम मानायला नकार द्यावा”

शहीदे आजम भगत सिंह यांची उद्धरणे

इतिहासाने पुन:पुन्‍हा सिद्ध केलेल्‍या एका सत्‍याकडे आम्‍ही जनतेचे लक्ष वेधू इच्छितो. गुलामी आणि असहाय्यतेत विव्हळणाऱ्या जनतेला चिरडून टाकणे सोपे आहे, परंतु विचार अमर असतात आणि जगातील कोणतीही शक्ती त्यांना चिरडून टाकू शकत नाही. जगातील महान साम्राज्‍ये धुळीला मिळाली, पण ज्या विचारांनी प्रेरित होऊन जनसामान्यांनी ही साम्राज्ये धुळीस मिळवली ते विचार आजही जिवंत आहेत.

शहीद भगतसिंह – धर्मांध दंगली व त्यावरील उपाय

जालियनवाला बागेतील १९१९ च्या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारने धर्मांध दंगलींचा खूप प्रचार सुरू केला. त्यामुळे १९२४ ला कोहाटमध्ये भयानक हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. यानंतरच्या काळात राष्ट्रीय-राजकीय विचारात दंगलीवर प्रदीर्घ चर्चा झाल्या. हे दंगे संपुष्टात आणण्याची गरज सर्वांनाच वाटली; पण काँग्रेस नेत्यांनी हिंदू-मुसलमान नेत्यांमध्ये तह करून त्याद्वारे दंगली थांबवण्याचे प्रयत्न केले.
क्रांतिकारी चळवळीने ही समस्या कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आपले विचार पुढे ठेवले. भगतसिंहांनी या संदर्भात लिहिलेला हा लेख जून, १९२८ मध्ये ‘किरती’च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

भगतसिंह जे म्हणाले ते आजही प्रासंगिक आहे

समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांरच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.