Tag Archives: नागेश

गिरीश कर्नाड: एका निर्भय कलाकारास आदरांजली

ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, विद्वान, उदारमतवादी, आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर परखड आणि राज्यसत्तेविरुद्ध भुमिका घेण्यास न कचरणारा एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.

मुंबईमध्‍ये अग्‍नीतांडव : दुर्घटना नाही, भांडवली व्यवस्थेचे बळी

या व्यवस्थेमुळेच आज मुंबईतील ४४ टक्के जनता झोपडपट्टीत राहण्यास बाध्य आहे. झोपडपट्टीत राहणारे कष्टकरी लोकच मुंबईला चालते ठेवण्याचे काम अहोरात्र करत असतात; मात्र बकाल जीवन, रोगराई, सुरक्षेचा अभाव त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. गरिबांचे शोषण करून श्रीमंतांच्या तुंबड्या भरणाऱ्या या भांडवली व्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब अगदीच गरीब होत चालले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत १ टक्के लोकांकडे ७३% संपत्ती जमा झाली आहे आणि वरच्या दहा टक्के लोकांकडे ८०% संपत्ती गोळा झाली आहे. जोपर्यंत ही व्यवस्था आहे तोपर्यंत कामगारांना ना रोजगाराची शाश्वती आहे, ना घरांची, ना अपघातांपासून सुरक्षिततेची! या व्यवस्थेला आमूलाग्र बदलून, कष्टकऱ्यांची क्रांतिकारी सत्ताच खऱ्या अर्थाने या सर्व समस्यांचे निवारण करू शकते.

नोटबंदी –चार आण्याची कोंबडी, बारा अाण्याचा मसाला

बँकेत जमा झालेल्या नोटांचे मूल्य आहे १५ लाख २८ हजार कोटी तर रद्द केलेल्या नोटांचे मूल्य होते १५ लाख ४४ हजार कोटी रु. म्हणजेच ९९% नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या आहेत. (यामध्ये सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा धरल्या नाहीत त्या अंदाजे १० हजार कोटी रु.असण्याची शक्यता आहे) सरकारला नोटबंदीतून १६ हजार कोटी रु. फायदा जरी धरला तरी सरकारला तोटाच झाला आहे कारण याच दरम्यान सरकारने नवीन नोटा छापण्यासह विविध कारणांसाठी २१००० हजार कोटी रु. खर्च केलेत. यालाच म्हणतात “चार आन्याची कोंबडी, बारा आन्याचा मसाला”.  तर हा तोटा आपला आहे, कारण हा सगळा पैसा आपल्याकडून कर रुपात गोळा केला जातो.

बिर्सा मुंडा आणि लहूजी साळवे – उपेक्षित स्वातंत्र्य सैनिक

अन्याय्य  ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्ध बळाचा वापर करणाऱ्या तसेच जनतेला त्यासाठी प्रशिक्षित करणाऱ्या अनेक नायकांची स्वतंत्र भारताच्या सरकारांनीसुद्धा एक तर उपेक्षा केली किंवा त्यांचे विचार दडपून त्यांच्या फक्त मूल्यविहीन, देवतुल्य प्रतिमा उभारून त्यांचे आदर्श निःसत्त्व करण्याचे प्रयत्न केले. बिर्सा मुंडा, लहूजी साळवे, भगतसिंह यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक कारण आहे. उत्पीडित पार्श्वभूमीतून (आदिवासी व दलित) आल्यामुळेसुद्धा बिर्सा मुंडा आणि लहूजी यांच्यावर अन्याय झाला आहे. परंतु अशीच पार्श्वभूमी असणाऱ्या अनेकांचा स्वतंत्र भारताच्या सरकारांनी वेळोवेळी गौरव करून त्यांचे विचारसुद्धा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कारण त्यांच्या राजकारणाचा आशय शोषक राजकीय सत्ता बळाने नष्ट करण्यापर्यंत जाणारा नव्हता. अन्यायाच्या विरोधात बळाचा वापर करण्याच्या व बळाचा वापर सशस्त्र संघर्षापर्यंत घेऊन जाणाच्या विचाराचे शासक वर्गाला नेहमीच भय वाटत असते. स्वतंत्र भारताचा शासकवर्गसुद्धा त्याला अपवाद नाही. अन्यायाच्या विरोधात जनतेला संघटित करून बळाने या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणे हीच बिर्सा आणि लहूजीसारख्या क्रांतिकारकांना आपली खरी श्रद्धांजली ठरू शकते.

कथा – नागडा राजा

एक राजा होता. त्याला नवनवीन कपडे घालण्याचा नाद होता. या राजाला एके दिवशी दोन बदमाशांनी उल्लू बनवलं. त्या बदमाशांनी पैजेवर सांगितलं की ते राजासाठी एक असा सुंदर पोषाख तयार करतील ज्याचा कुणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही. आणि हो, या पोषाखाची एक आगळी मजा असणार आहे. हा पोषाख कुठल्याही मूर्ख किंवा आपल्या पदासाठी अयोग्य व्यक्तीला दिसणार नाही. राजाने ताबडतोब आपल्यासाठी पोषाख बनविण्याचा आदेश देऊन टाकला. मग काय, लगोलग बदमाशसुद्धा माप घेण्याचा, कापण्या-शिवण्याचा अभिनय करू लागले. पोषाख शिवण्याचं काम कसं चाललंय हे बघण्यासाठी राजानं वारंवार आपल्या मंत्र्यांना पाठवलं. प्रत्येक वेळी जाऊन ते राजाला सांगत, आम्ही आमच्या डोळयांनी पोषाख बघून आलोय. खरोखर, खूपच सुंदर पोषाख तयार होतोय. खरं तर त्यांनी काही ओ की ठो पाहिलं नव्हतं. पण स्वतःला मूर्ख म्हणवून कसं घ्यायचं? अन् त्याच्याही पुढे, आपल्या पदासाठी आपण अयोग्य आहोत हे म्हणवून घेणं तर त्यांना अजिबात नको होतं.