Tag Archives: मुंबई

कोरोना साथीत पुणे व मुंबईतील कामगारांची दुरावस्था

हातातील काम गेल्याने जगावे की मरावे असा प्रश्‍न पडलेल्या कामगारांनी हाताला काम द्यावे अथवा सरकारने मदत तरी करावी, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रशासनाकडून तीन महिने मोफत राशन व मोफत गॅस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण ते अनेकांसाठी अजूनही हवेतच आहे.

‘गोरक्षक’ गुंडांच्‍या आतंकाविरोधात मुंबई येथे विरोध प्रदर्शन

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. आणि शेवटची सुद्धा नसणार असे दिसते. या घटनेच्‍या विरोधात दिनांक १५ एप्रिल रोजी अंधेरी रेल्‍वे स्‍टेशन (पूर्व) येथे नौजवान भारत सभा, बिगुल मजदूर दस्‍ता तसेच इतर संघटनांनी विरोध प्रदर्शन केले. विरोध प्रदर्शनाच्‍या सुरवातीला काही क्रांतीकारी घोषणा दिल्‍या गेल्‍या. त्‍यानंतर नौजवान भारत सभेचे सत्‍यनारायण यांनी आपले म्‍हणने मांडले. सुरवातीला त्‍यांनी घडलेल्‍या घटनेची सविस्‍तर माहिती उपस्थित लोकांना सांगितली व ते पुढे म्‍हणाले, मागच्‍या काही दिवसांपासुन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ म्‍हणजेच आरएसएस ह्या संस्‍थेशी संलग्‍न असणाऱ्या काही संघटनानी भावनांना भडकावून जागो जागी गोरक्षेच्‍या नावाखाली गुंडांच्‍या टोळ्या उभ्‍या केल्‍या आहेत.

स्‍वच्‍छता अभियानाचे देशव्‍यापी नाटक सुरु असतानाच सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह खचून लोकांचा मृत्‍यू

सत्‍तेवर आल्‍यापासूनच मोदी सरकार सातत्‍याने स्‍वच्‍छता अभियानाची दवंडी पिटवीत आहे. हाथामधे झाडू घेऊन फोटो काढण्‍यापासून टी.व्‍ही., वर्तमानपत्रे, रेडिओवर अमाप पैसे खर्च करून जाहीरातींमार्फत जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या बाता मारल्‍या जात आहेत. परंतु वास्‍तविकत: स्‍वच्‍छ भारत निर्माण करण्‍यासाठी ज्‍या गोष्‍टींची अत्‍यंत आवश्‍यकता आहे, त्‍यावर काहीही खर्च केला जात नाही. मुंबईसारख्‍या महानगरामधे जेथील ६० टक्‍के लोकसंख्‍या झोपडपट्ट्यांमध्‍ये छोट्या-छोट्या खुराडयांत राहते, जी किमान मुलभूत सुविधांपासूनच वंचित आहे, तेथील सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांची अवस्‍था पाहूनच तिथल्‍या परिस्थितीविषयी अंदाज बांधता येऊ शकतो. सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांची याच गंभीर परिस्थितीचा परिणाम नजिकच्‍या काळातच मुंबईत झालेल्‍या अनेक लोकांच्‍या मृत्‍यूच्‍या रूपाने समोर आला आहे.

मानखुर्द (मुंबई) येथे शहीद भगतसिंह पुस्तकालयाचे उद्घाटन

आपल्या समृद्ध देशातील बहुसंख्य जनता आजसुद्धा गरीबी, बेरोजगारी आणि भुकेची बळी ठरते आहे कारण संसाधनांवर काही मूठभर भांडवलदार मांड ठोकून बसले आहेत. ते आपल्या नफ्यासाठी कष्टकऱ्यांना दिवसरात्र राबवत असतात. आज टीव्ही, सिनेमा उद्योग, इंटरनेटपासून सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे लहान मुले व तरुणांना स्वार्थी, हिंसक आणि विकृत बनवणाऱ्या गोष्टी मनोरंजनाच्या नावाखाली देत आहेत. यामुळे समाजात वेगवेगळ्या विकृती, अंधविश्वास पसरत आहेत. या नफेखोर व्यवस्थेला पर्याय उभा करण्याच्या दीर्घ लढ्यासाठी तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि समृद्ध असणे गरजेचे आहे. निरोगी मनोरंजनाबरोबरच लहान मुले व तरुणांमध्ये उच्च जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. म्हणूनच , वैज्ञानिक विचार देणारी तसेच सामान्य लोकांच्या आयुष्याचे वास्तव व परिवर्तनाचा मार्ग यांच्याशी वाचकांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे.

सर्व कामगारांनी संघटित झाले पाहिजे

ज्या कारखान्या मध्ये मी काम करतो तिथे 25 ते 30 लोक काम करतात, ज्यापैकी 10 ते 12 महिला आहेत. इथे जवळच आणखी दोन कारखाने आहेत. या तीन कारखान्यांमध्ये मिळून जवळपास 350 कामगार काम करतात त्यात जवळपास 200 महिला कामगार आहेत. या कारखान्यांमध्ये स्टी‍ल पोलिशिंगचे अत्यंत धोकादायक काम चालते. स्टील लाइन मधली बहुतांश कामे तशीही अत्यंत धोकादायक असतात आणि कारखान्यांमध्ये दररोजच अपघात घडत असतात. अश्या अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना किरकोळ उपचार उपलब्ध करतो, परंतु अशा अपघातांमध्ये त्यांना कधीही नुकसान भरपाई दिली जात नाही. अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना कामावरून काढून सुद्धा टाकतात.