‘निकारागुआ’चे महाकवी अर्नेस्टो कार्देनाल यांची कविता – सेलफोन
तुम्ही तुमच्या सेलफोनवर बोलता,
बोलता, बोलत राहता
आणि हसता तुमच्या सेलफोनवर,
तो कसा बनला आहे याची काहीच माहिती नसताना,
आणि तो काम कसा करतो याची त्याहूनही कमी माहिती असताना
पण त्याने फरक काय पडतो,
अडचण ही आहे की तुम्हांला माहीत नाही,
जसे माहीत नव्हते मलाही
की कित्येक माणसे कांगोमध्ये मरतात
हजारो हजार
त्या सेलफोनपायी.
कांगोमध्ये मरतात,
त्याच्या डोंगरांमध्ये आहे कोल्टन