कविता – बायांनो ! बोला! / कविता कृष्णपल्लवी
बायांनो ! बोला!
कष्टाच्या दुहेरी बोजाने, थकून दमलेल्या
उदास-निराश सर्व बायांनो! बोला!
खुल्या कंठाने बोला !
बायांनो ! बोला!
कष्टाच्या दुहेरी बोजाने, थकून दमलेल्या
उदास-निराश सर्व बायांनो! बोला!
खुल्या कंठाने बोला !
शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली
पैसेवाल्या पोरांनी जागा बळकावली
गरिबांची पोरं बघा कशी खाली राहिली
मुली कितीक चढती निम्म्या खाली उतरती,
शिक्षणाची गाडी चालली …
चेटकिणी खूप हसतात
निलाजऱ्या आणि जिद्दी असतात
अत्यंत बडबड्या असतात अन् प्रत्येक मुद्यावर
वाद घालत राहतात न थकता.
ही आग चहू बाजूनं हो लागली संसारा
सवालाचा जबाब दे रं देशाच्या सरकारा
दुधाच्या रंगाची आज बुजली वळख
परागंदा झालं हो, खोबरं खारीक
गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा
सवालाचा जबाब दे रं …
उठाव झेंडा बंडाचा
झेंडा आपुल्या रक्ताचा
कामगार स्वातंत्र्याचा
शेतकरी स्वातंत्र्याचा
लाल,लाल,लाल,झेंडा क्रांतीचा
हे जग तुझ्या श्रमावर चालले आहे
किती रे करतोस रक्ताचे पाणी
मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो
बाकीच्यांचा हिशोब कशाला?
लेनिन वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात,
ते होते आमचे शिक्षक.
ते लढत राहिले आमच्या सोबत.
ते वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, विद्वान, उदारमतवादी, आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर परखड आणि राज्यसत्तेविरुद्ध भुमिका घेण्यास न कचरणारा एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.