Category Archives: कला-साहित्‍य

उच्चभ्रूंसाठी ‘कोल्डप्ले’ चा शो, बाकीच्यांसाठी दैन्य!

सरकार आणि कॉर्पोरेट-नियंत्रित माध्यमांच्या मते, उर्वरित जग गंभीर आर्थिक आव्हानांना तोंड देत असतानाही भारत पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वीपणे चमकत आहे. आता अजून काय मागावे बरे? शेवटी, कोल्डप्लेचे क्रिस मार्टिन त्यांच्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात भव्य व्यासपीठावर प्रस्तुती करत होते. अशा भव्यदिव्य शों द्वारे देशाची प्रतिमा झळकत असताना, वाढती बेरोजगारी, वाढत्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किंवा महागाईबद्दल काळजी का करावी? “नव्या भारतात” आपले स्वागत आहे, जिथे सरकार प्रगतीची काळजीपूर्वक तयार केलेली प्रतिमा चमकावण्यासाठी करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत आहे.

सिनेमाद्वारे अंधराष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा प्रचार: कामकऱ्यांना भरकटवणारे प्रचारतंत्र

19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या सिनेमाच्या उदयापासून आजपर्यंत तो कधीही तत्कालीन राजकारणापासून वेगळा राहिलेला नाही. त्या त्या देशातील सत्ताधारी वर्ग सिनेमाचा उपयोग आपल्या विचारधारेचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी करत असतो. भारतात फॅशिझम सत्तेत आल्यानंतर  गेल्या 10 वर्षांतील अनेक, आणि तात्कालिकरित्या बघायचे झाले तर नजिकच्या काळात प्रदर्शित झालेले—काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, रामसेतू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सम्राट पृथ्वीराज, आर्टीकल 370, धर्मवीर, शेर शिवराज, मै अटल हूॅं, आदिपुरुष, शेरशाह, अटॅक, मेजर, आणि असे अनेक—मोठ्या बजेटचे सिनेमे हिंदुत्व आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकीय प्रचारासाठी आणि हिंदुत्वाचे राजकारण जनतेत मुरवण्यासाठी बनवले जात आहेत.

कोट्यवधी कामगार-कष्टकऱ्याची मुलं शिक्षणासह खेळापासूनही वंचित! मग ऑलिपिकमध्ये मेडल कुठून येणार?

आतापर्यंत एकूण फक्त 41 पदके भारताने मिळवली आहेत. त्यात सामूहिक खेळात हॉकीने मोठी बाजी मारली तर वैयक्तिक खेळांमध्ये नेमबाजी, शर्यत, कुस्ती, वेटलिफ्टींग अशा विविध खेळांमध्ये पदके मिळवली. पण तरीही 140 कोटी लोकसंख्या आणि इतर भौगोलिक परिस्थितीच्या मानाने भारताने मिळवलेल्या पदकांची संख्या एवढी कमी का? हा प्रश्न उपस्थित होतोच.

कविता: अजून लढणे बाकी आहे

अजून लढणे बाकी आहे ✍मुक्ता पहाट झाली, सूर्य उगवला उजेड तरीही अपुराच आहे अंधाऱ्या खोलीत या माझ्या दारिद्र्याचे अमाप राज्य आहे… बापाला अस्थमा मग पदरी ग्रॅज्युएशन नोकरी तरीही दुरापास्त आहे…

हरिओम राजोरिया यांची बेरोजगारी वर कवितामाला: बेकार पोर

बेकार पोर
आईला घाबरत नाही
बापाला घाबरत नाही
आणि ना मरणाला
बेकारीच्या दिवसांमध्ये
सगळी भितीच मेली त्याची

लैंगस्टन ह्युजेसच्या काही कविता

लैंगस्टन ह्युजेसच्या काही कविता   उफाळणारे जलनग तुम्हा लोकांसाठी तुम्ही लोक, जे की समुद्रावरचा फेस मात्र आहात समुद्र नव्हे काय अर्थ आहे तुमच्यासाठी लहरींच्या सतत माऱ्याने तुटणाऱ्या पर्वतांचा वा त्या…

कविता

स्वप्नांना आवळून ठेवा घट्ट,
त्यांच्या मृत्यूनंतर
जीवन आहे एक पंख तुटलेली चिमणी
जी उडू शकत नाही..
स्वप्नं आवळून ठेवा,
स्वप्नांशिवाय
जीवन आहे बर्फाच्छादित
नापीक जमीन.

कविता

कुठून पैदा होतात
बलात्कारी
खूनी, लंपट
अमानवीय
पशुवत जीव !

कविता : भिकारी

कविता : भिकारी मनबहकी लाल भिकारी आले नवयुगाचे मसीहा बनून लोकांना अज्ञान, निरक्षरता आणि निर्धनतेपासून मुक्ती देण्यासाठी अद्भुत वक्तृत्व, लेखन-कौशल्य आणि संघटन क्षमतेने सज्ज स्वस्थ-सुंदर-सुसंस्कृत भिकारी आले आमच्या वस्तीमध्ये आशिया-आफ्रिका-लॅटिन…