देशभक्तीच्या बॉम्बवर्षक विमानापासून ते आयुष्याच्या कठोर वास्तवापर्यंत : एका युवकासोबत संवाद
काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर आझादांच्या शहीद दिनानिमित्त (27 फेब्रुवारी) लखनऊ मध्ये चौक सभांमध्ये नौजवान भारत सभेच्या जत्थ्यासोबत झालेला एका तरुणाचा संवाद.
तरुण : चंद्रशेखर आझाद जर आज असते तर पाकिस्तान्यांना झोडून काढलं असतं, जसे मोदीजी आज करत आहेत.
नौ.भा.स. चे साथीदार : चंद्रशेखर आझाद सारखे क्रांतिकारी जर आज असते तर या देशाचे चित्र आणि भाग्य काही वेगळंच असतं.
तरुण : पण काहीही असो, मोदी ने दुनियेला दाखवून दिलं. लीडर असावा तर असा. आता आर-पार होऊन जायला पाहिजे.
काही वेळ ही चर्चा चालत राहिली की शासक वर्गाच्या आपापसातल्या लढाईमध्ये दोन्ही बाजूंच्या सामान्य जनतेवरच मृत्यू आणि आपत्तीचे संकट ओढवते, सत्ता आणि भांडवलाच्या मालकांच्या तिजोऱ्या तर युद्धाने सुद्धा भरल्याच जातात. पण भाऊ ऐकायला तयारच नव्हता.
तेव्हा एका साथीदाराने विचारलं : तसं आपण काय करता?
तरुण : …मॉलमध्ये हाऊसकिपींगच्या कामाला आहे.
नौभास : पैसे किती मिळतात?
तरुण : महिन्याला 8000 मिळतात.
नौभास :: फक्त 8000? तुम्हाला माहित आहे का, हे तर यु.पी.च्या किमान मजुरीपेक्षाही कमी आहे?
तरुण : हे तर माहित नाही, पण साला ठेकेदार यातून सुद्धा कापून घेतो. वेळेवर देत सुद्धा नाही. काही ना काही ठेवूनच घेतो.
नौभास : मग तुम्ही त्याच्याविरुद्ध लढत नाही?
तरुण : अरे काय घंटा लढणार? महिन्याच्या चार सुट्ट्यासोडून एक दिवससुद्धा हो-नाही केलं तर नोकरीवरून काढायची धमकी देतो.
नौभास : किती तास काम करता?
तरुण : डेली १०-११ तास. पूर्ण वेळ सुपरवायझर डोक्यावर बसून असतो.
नौभास : अरे मग अशी नोकरी सोडून का नाही देत? पैसे सुद्धा एवढे कमी आहेत.
तरुण : भाऊ, डिग्र्या मिळालेले चांगले चुंगले लोक तर भटकत आहेत. जी नोकरी मिळाली तिला पकडून बसा, यातच भलं आहे.
नौभास : पण मोदीजी तर म्हणत होते कि कोट्यवधी नोकऱ्या देणार?
तरुण : अरे सगळं बोलाची कढी आणि बोलाचा भात असतं.
नौभास : आपल्याला वाटत नाही का कि युद्ध-युद्ध या गोंगाटात रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, गरिबी वगैरे या गोष्टी हवेत गायब झाल्या? पाच वर्ष काहीच नाही केलं म्हणून आता फिरून- फिरून नकली देशभक्तीच्या नावावर लाज विकून वोट मागत आहेत?
तरुण : हे बघा, मला जास्त पॉलिटिक्स माहित नाही. जे टिव्हीवर पाहिलं तेच तुम्हाला बोललो.
नौभास : चंद्रशेखर आजाद, भगतसिंह सारख्या क्रांतिकारकांनी यासाठीच आपले प्राण दिले ज्यामुळे देशातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल, प्रत्येक तरुणाला हक्काचं काम मिळेल, समाजामध्ये सर्वांना बरोबरी आणि आदरानं जगण्याचा हक्क मिळेल. पण आपण त्यांना आठवत नाही तर मोदीसारख्यांच्या नादाला लागतो जे गरिबांबद्दल बोलतात आणि फक्त अंबानी-अडाणी सारख्यांच्या तिजोऱ्या भरण्यात लागले आहेत.
थोडं अजून बोलणं होत-होत तो तरुण देशभक्तीच्या बॉम्बवर्षक विमानावरून आपल्या आयुष्याच्या वास्तवातील कठीण जमिनीवर उतरला होता. अभियानाचा जत्था तिथून निघता-निघता तो हळवा झाला आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. नोकरी जाण्याची भीती नसती तर मीसुद्धा सुट्टी घेऊन आपल्या सोबत आलो असतो, असे म्हणून त्याने निरोप घेतला.