Tag Archives: गोर्की

उद्धरण – कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020

माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, व जगाला जगवतात. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्याला विद्रूप करणं मला आवडत नाही.

उद्धरण – कामगार बिगुल, जानेवारी 2019

“नागरिक अवज्ञा आपली समस्या नाहीये. आपली समस्या आहे नागरिकांची आज्ञाधारकता. आपली समस्या आहे की जगभरात लोक नेत्यांच्या, हुकूमशहांच्या आदेशांचे पालन करत आलेत .. आणि या आज्ञाधारकतेमुळे कोट्यवधी लोक मारले गेले आहेत. … आपली समस्या ही आहे की जगभरात गरिबी, भूकबळी, अज्ञान, युद्ध आणि क्रूरतेचा सामना करणारे लोक आज्ञाधारक बनून आहेत. आपली समस्या ही आहे की लोक आज्ञाधारक बनलेले आहेत जेव्हा तुरुंग सामान्य चोरांनी भरलले आहेत आणि मोठे चोर देश चालवत आहेत. ही आमची समस्या आहे”

भूतकाळाच्या कडू आठवणी, भविष्याची सोनेरी स्वप्ने आणि भय व आशेची ती रात्र

“मी प्रथम स्वतः अभ्यास करणार, अन् मग इतरांना शिकवणार. आम्ही कामगारांनी अभ्यास करायला हवा. आपले जीवन इतके खडतर कां असते हे नीट समजून घ्यायला हवं.”