जागतिक पर्यावरण दिनाच्या (5 जून) निमित्ताने काही उद्धरणे
अशाप्रकारे प्रत्येक पावलावर आपल्याला जाणीव होते की एखाद्या विजेत्याने विदेशी लोकांवर विजय मिळवावा तसे, एखाद्या बाह्य शक्तीप्रमाणे, आपण निसर्गावर राज्य करत नाही; तर आपण हाडा-मांसा-रक्ता-बुद्धीची माणसं निसर्गाचाच भाग आहोत आणि निसर्गातच अस्तित्वमान आहोत, आणि निसर्गावरील आपले सगळे प्रभुत्व यातच सामावले आहे की निसर्गाचे नियम समजू शकण्याची आणि अचूकरित्या लागू करण्याची इतर सजीवांपेक्षा उजवी अशी आपली क्षमता आहे.
– फ्रेडरिक एंगल्स, “निसर्गाचा द्वंद्ववाद”
एखादा संपूर्ण समाज, राष्ट्र अथवा अगदी सर्व अस्तित्वातील समाज जरी एकत्र घेतले, तरी ते पृथ्वीचे मालक होऊ शकत नाहीत. ते फक्त तिचे धारक आहेत, तिचे लाभधारक आहेत, आणि येणाऱ्या पिढ्यांना पुथ्वी अधिक उत्तम स्थितीमध्ये सुपूर्द करणे हे त्यांचे एक सामान्य पालकासारखे कर्तव्य आहे.
– कार्ल मार्क्स, “भांडवल, खंड 3”
वर्ग संघर्षाशिवाय पर्यावरणाचा मुद्दा, म्हणजे निव्वळ बागकाम!
– चिको मेंडिस, ब्राझिली पर्यावरण कार्यकर्ता
मनुष्य निसर्गाचा भाग आहे… निसर्ग म्हणजे माणसाचे अजैव शरीर – निसर्ग, म्हणजे मानवी शरीराबाहेरील सर्व काही. मनुष्य निसर्गातच जगतो – म्हणजे निसर्ग त्याचे शरीर आहे ज्यासोबत मृत्यूपर्यंत त्याला सतत आंतरक्रिया करणे भाग आहे. माणसाचे शारीरिक आणि आत्मिक जीवन निसर्गाशी जोडलेले आहे म्हणजे थोडक्यात निसर्ग स्वत:शीच जोडलेला आहे, कारण मनुष्य निसर्गाचा भाग आहे.
– मार्क्स, आर्थिक आणि तत्वज्ञानविषयक हस्तलिखिते 1844
कामगार बिगुल, जून 2021