रोहितच्या संस्थात्मक हत्येचा देशभरातून निषेध

१९ जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅंपसमध्ये निदर्शन करणारे युनिव्हर्सिटी कम्युनिटी फार डेमोक्रेसी अण्ड इक्वेलिटी, अखिल भारतीय जाति विरोधी मंच, आणि इतर जनसंघटनांचे सदस्य.

१९ जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅंपसमध्ये निदर्शन करणारे युनिव्हर्सिटी कम्युनिटी फार डेमोक्रेसी अण्ड इक्वेलिटी, अखिल भारतीय जाति विरोधी मंच, आणि इतर जनसंघटनांचे सदस्य.

हैदराबाद केंद्रिय विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येने देशभरातील प्रगतिशील विद्यार्थी आणि संघटनांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले. १७ जानेवारीपासून आतापर्यंत असंख्य निदर्शने झाली आहेत, आणि अजूनही सुरू आहेत. बिगुल मजदूर दस्ता, दिशा छात्र संगठन, अखिल भारतीय जातिविरोधी मंच, नौजवान भारत सभा आणि युसीडीई आदी संघटनांनीसुद्धा या मुद्यावर विद्यार्थी आणि तरुणांना घेऊन वेगवेगळ्या भागांमध्ये जबरदस्त प्रतिरोध व्यक्त केला. विद्यार्थी-तरुण आणि कामगारांनी रोहितच्या हत्येला कारणीभूत असलेले भाजप मंत्री बंडारू दत्तात्रेय, मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांच्या निष्कासनाची मागणी करीत या मुद्द्यावर जनसामान्यांमध्ये प्रचार केला. या सर्व जबाबदार व्यक्तींना एका संवेदनशील आणि गंभीर विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल कठोर शिक्षा झाली पाहिजे व जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.

२३ जानेवारी रोजी इलाहाबाद येथे दिशा छात्र संगठन आणि नौजवान भारत सभेने अन्य जनसंघटनांसह विरोध जुलूसाचे आयोजन केले. इलाहाबाद येथील पी.डी.टंडन पार्कपासून सिविल लाईन्स येथील सुभाष चौकापर्यंत प्रतिरोध मार्च काढण्यात आला.

कालिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरामध्ये युसीडीई व अन्य विद्यार्थी संघटनांनी केंद्र सरकार व दोषी व्यक्तींच्या विरोधात जोरदार घोषणा देत विरोध मार्च काढला. मुंबईतील सर्व प्रागतिशील संघटनांच्या संयुक्त मोर्चाद्वारे भायखळ्यापासून आजाद मैदानपर्यंत विशाल रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो लोक सहभागी झाले होते. नौजवान भारत सभा, नरवाणा (हरयाणा) शाखेने धमतान साहिब गावामध्ये या घटनेच्या विरोधात कोपरा सभा घेत पत्रके वाटली तसेच धमतान बसस्थानकावर निदर्शकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. कलायतमध्येसुद्धा निदशर्ने करून पत्रके वाटण्यात आली तसेच स्मृती इराणी यांचा पुतळा जाळून रोहितला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. दिशा छात्र संघटनेने रोहितच्या संस्थात्मक हत्येच्या विरोधात इलाहाबादच्या पीडी टंडन पार्क, सीवील लाईन्स पासून सुभाष चौकापर्यंत प्रतिरोध मार्च काढला, तसेच कदम मिलाओ साथियों या गीतासह लोकांना एकजूट होऊन निरंकुश फासीवादी शक्तींना प्रत्युत्तर देण्याचे आवाहन करण्यात आले. दिशा छात्र संघटनेने दिल्लीत मानव संसाधन विकास मंत्रालयासमोर निदर्शने केली व दोषींना ताबडतोब शिक्षा देण्याची मागणी करीत इंकलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

२१ जानेवारी रोजी लखनऊ येथे निदर्शन करणारे अखिल भारतीय जाति विरोधी मंच, नई दिशा छात्र मंच, नौजवान भारत सभा, जागरूक नागरिक मंच आणि वेगवेगळ्या संघटनांचे सदस्य.

२१ जानेवारी रोजी लखनऊ येथे निदर्शन करणारे अखिल भारतीय जाति विरोधी मंच, नई दिशा छात्र मंच, नौजवान भारत सभा, जागरूक नागरिक मंच आणि वेगवेगळ्या संघटनांचे सदस्य.

दिशा छात्र संघटनेच्या महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक शाखेनेही पत्रके वाटून तरुणांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवले. लखनौ येथे नौजवान भारत सभा, नयी दिशा मंच आणि वेगवेगळ्या लोक संघटनांनी जीपीओ स्थित गांधी प्रतिमेपाशी निदर्शने करून पत्रके वाटली. पंजाब स्टुडेंट्स युनियन – ललकारने पंजाबमध्ये मानसा, भटिंडा आणि चंदीगढ येथे वेगवेगळ्या ठिकाणी क्रांतिकारी गीते गात आपला विरोध व्यक्त केला आणि रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रगतिशील आणि न्यायप्रिय लोकांना रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचे आवाहन केले. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोहितच्या प्रकरणाने लोकांमध्ये निर्माण केलेला असंतोष दिवसागणिक वाढतो आहे व दोषींना शिक्षा आणि रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थी प्रतिबद्ध होऊन लढत आहेत. सर्व प्रगतिशील विद्यार्थी संघटनांनी केलेल्या निदर्शने आणि मोर्चांमध्ये वक्त्यांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून विस्तारपूर्वक आपले विचार मांडले. एकूण घटनाक्रम मांडत वक्त्यांनी सांगितले की संपूर्ण विद्यापीठ प्रशासनापासून केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय, मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी आदींनी रोहितला आत्महत्या करण्यास भाग पाडले. आंबेडकर स्टुडेंट्स असोसिएशनचा सदस्य असलेला रोहित आणि त्याचे सोबती बराच काळ संघ आणि संघाशी जोडलेल्या इतर संघटनांच्या निशाण्यावर होता. हिंदुत्त्ववादी शक्तींनी देशभरात असहमतीचा गळा आवळून उच्च शिक्षण संस्था, कला आणि साहित्य संस्था आदींच्या भगवाकरणाची जी मोहीम उघडली आहे, तिचा वेगवेगळ्या माध्यमांतून बुरखा फाडण्यात रोहित सक्रिय भूमिका पार पाडीत होता. गेल्या वर्षी आगस्टमध्ये एका एबीवीपी नेत्याच्या खोट्या तक्रारीवरून केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी स्मृती इराणी यांना रोहित आणि त्याच्या सोबत्यांवर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आणि मानव संसाधन मंत्रालयाने विद्यापीठाला पाच पत्रे पाठवून दबाव निर्माण केला व रोहितसह पाच शोधविद्यार्थ्यांची हास्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली, तसेच त्यांची फेलोशिपही थांबवण्यात आली. त्यानंतरही त्यांनी या अत्याचाराच्या विरोधात मोकळ्या आकाशाखाली आपला संघर्ष सुरूच ठेवला, परंतु प्रशासनाने त्यांच्या संघर्षाकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि अखेरीस निराश होऊन विज्ञानाच्या क्षेत्रात विलक्षण रस असणाऱ्या रोहितने घुसमटलेल्या जीवनापेक्षा मृत्यूला मिठीत घेणे पसंत केले. ज्यांचे प्रतिनिधी आज सत्तेच्या जवळजवळ प्रत्येक संस्थेमध्ये उच्च पदांवर आहेत किंवा त्यांना तेथे बसवण्याची मोहीम भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सुरू झालेली आहे, त्या पितृसत्ता, ब्राह्मण्यवाद आणि धर्माचे राजकारण करणाऱ्या फासीवादी टोळ्यांच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता, हाच त्याचा दोष होता. अस्मितेचे राजकारण करणारे लोक या मुद्द्यावर एक तर गप्प आहेत किंवा हा मुद्दा मतांच्या राजकारणासाठी वापरण्याच्या प्रयत्नात आहेत, व त्यांच्यापैकी बरेच जण अगोदरच फासीवाद्यांच्या कुशीत जाऊन बसले आहेत, असेही वक्त्यांनी सांगितले. रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण समर्थन देण्याची घोषणा करीत वक्त्यांनी सांगितले की या आंदोलनाला जातीयवादी आणि धार्मिक कट्टरपंथी, रूढीवादी शक्तींच्या युतीच्या विरोधातील व्यापक संघर्षाशी जोडूनच आपण रोहितच्या बलिदानाला खरीखुरी श्रद्धांजली वाहू शकतो.

१८ जानेवारी रोजी एम.एच.आर..डी. बाहेर निषेध करणारे वेगवेगळ्या संघटनांचे सदस्य आणि विद्यार्थी- तरुण. या वेळी दिशा छात्र संगठन आणि नौजवान भारत सभेचाही सहभाग होता. दिल्ली सरकारतर्फे या निदर्शकांवर भयंकर लाठी चार्ज करण्यात आला आणि कित्येकांना अटकही करण्यात आली. तरीही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोनल सुरूच ठेवले.

१९ जानेवरी रोजी चंदीगढ विद्यापीठात पंजाब स्टुडेंट्स युनियन (ललकार), नौजवान भारत सभा यांनी अन्य विद्यार्थी संघटना आणि जनसंघटनांसह निदर्शने केली.

१९ जानेवरी रोजी चंदीगढ विद्यापीठात पंजाब स्टुडेंट्स युनियन (ललकार), नौजवान भारत सभा यांनी अन्य विद्यार्थी संघटना आणि जनसंघटनांसह निदर्शने केली.

२२ जानेवारी रोजी पंजाब स्टुडेंट्स युनियन (ललकार) ने नेहरू मेमोरियल गवर्नमेंट कालेज, मानसा, पंजाब येथे विरोध सभेचे आयोजन केले.

२२ जानेवारी रोजी पंजाब स्टुडेंट्स युनियन (ललकार) ने नेहरू मेमोरियल गवर्नमेंट कालेज, मानसा, पंजाब येथे विरोध सभेचे आयोजन केले.

२१ जानेवारी रोजी नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाति विरोधी मंचतर्फे कलायत, कैथल, हरियाणा येथे विरोध जुलूसाचे आयोजन करण्यात आले आणि स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्या पुतळ्यांचे दहन करून सदर घटनेचा निषेध करण्यात आला.

कामगार बिगुल, फेब्रुवारी २०१६