भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या ८६व्या शहीद दिनानिमीत्त ‘नौजवान भारत सभा’, ‘बिगुल मजदूर दस्ता’ व इतर सहयोगी संघटनांद्वारे देशव्यापी कार्यक्रम
शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या ८६व्या (२३ मार्च) शहीद दिनानिमीत्त ‘नौजवान भारत सभा’, ‘बिगुल मजदूर दस्ता’ व इतर सहयोगी संघटनांद्वारे देशव्यापी कार्यक्रम आयोजित केले गेले. मुंबई, अहमदनगर, दिल्ली, चण्डीगढ, लुधियाना, पटना, इलाहाबाद, लखनऊ, गाजियाबाद, देहरादून इत्यादि ठिकाणी शहीदांच्या क्रांतिकारी विचारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे पोहचवले गेले.
मुंबई आणि अहमदनगर या ठिकाणी १५ दिवसीय शहीद स्मृति अभियानाचे आयोजन केले होते. या अंतर्गत पत्रके वितरण, चौका-चौकात सभा, पुस्तक प्रदर्शन, रैली, फिल्म स्क्रीनिंग, परिसंवादाद्वारे शहीदांच्या विचारांना लोकांमध्ये पोहचविले गेले. या अभियानाचे शेवटच्या दिवशी (३ एप्रिल) अहमदनगर येथे रहमत सुल्तान फाऊंडेशन या सभागृहा मध्ये ‘फासीवादच्या आजचा काळात भगतसिंहाची प्रासंगिकता काय आहे’ या विषयावर परिसंवाद आणि दोन पुस्तकांचा लोकार्पणाचा कार्यक्रम केला गेला. या परिसंवादाचे मुख्य वक्ता ‘कामगार बिगुल’चे संपादक सोमनाथ केंजळे यांनी भारताच्या क्रांतीकारी आंदोलनाच्या धार्मिक पुनरुत्थानवादापासुन ते वैज्ञानिक समाजवादापर्यंत सविस्तरपणे आपले म्हणने मांडले. भगतसिंहाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य अपेक्षित होते, राजकीय जीवनात धर्माच्या हस्तक्षेपाच्या बाबतीत भगतसिंह काय विचार करत होते, अस्पृश्यता समस्येला कशाप्रकारे बघत होते आणि भारतीय जनतेसाठी कशाप्रकारे फक्त कामगार क्रांतीचे स्वप्न बघत होते, इ. वर सोमनाथ यांनी रोचकपणे प्रकाश टाकला. त्यानंतर फासीवादाबाबत बोलताना ते म्हणाले की भगतसिंहांच्या वेळी हिटलर आणि मुसोलिनीचा बर्बर चेहरा पुर्णपणे समोर आला नव्हता. तरीदेखील भगतसिंह समजत होते की कशाप्रकारे जेव्हा भांडवलदार वर्ग जनतेला लुटण्यासाठी असाह्य व्हायला लागतो, तेव्हा तो लोकांना आपापसात लढवतो. त्यांनी भगतसिंहाचे लेख ‘धार्मिक दंगली आणि त्यावर उपाय’ व ‘धर्म आणि आपला स्वतंत्रता संग्राम’ यांचा संदर्भ देत सांगितले की भगतसिंह सांप्रदायिक झगडयांच्या मागे असलेले खरे कारण म्हणजेच आर्थिक कारणाला समजत होते आणि त्याचसाठी भगतसिंह वर्गीय एकता करण्यावर जोर देत होते. सोमनाथ यांनी शेवटी सांगितले की सध्याच्या काळात तरुणांना भगतसिंहाच्या मार्गानेच पुढे जावे लागेल. देशातल्या कामगार वर्गाला एकत्र करून फासीवादावर मात करावी लागेल तेव्हाच भगतसिंहाच्या इंकलाब झिंदाबादाचे स्वप्न साकार करता येईल.
कामगार बिगुल, एप्रिल २०१७