उद्धरण

राज्यकर्त्यांची शक्ती जनतेच्या अज्ञानामध्ये सामावलेली असते. राज्यकर्त्यांना हे तथ्य चांगलच उमगलेलं असतं, त्यामुळे ते नेहमीच योग्य ज्ञान जनतेपर्यंत पोहचण्याला सक्रीय विरोध करतात.

लियो टॉलस्टॉय

कायदा हा कोळयाने गुंफलेल्या जाळया सारखा असतो. मोठी माशी त्यातून स्वतःची सहज सुटका करुन घेते, पण छोटी माशी सुटण्याचा जेवढा प्रयत्न करेल तेवढी अधिक फसत जाते

बाल्ज़ाक (महान फ्रेंच लेखक)

क्रांती ही शेकडो-हजारो वर्षे व्यवस्थेच्या जोखडांखाली पिचलेल्या, दबलेल्या व शोषित लोकांसाठी ‘उत्सव’ असते.

व्लादमिर लेनिन

क्रौर्य हे भेकड लोकांकडून लादण्यात आलेल्या कायद्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे, कारण भेकड लोक केवळ क्रूर होऊनच शक्तिशाली बनू शकतात.

कार्ल मार्क्स (‘जंगल चोरी कायद्यावरील वाद-विवाद’, 1842)

त्यांची भीती
जेव्हा आम्ही गातो, ते भयभीत होतात.
ते घाबरून जातात जेव्हा आम्ही मूक होतो.
ते घाबरतात, आमच्या गीतांना,
आणि आमच्या मौनालासुद्धा.

कात्यायनी

भगतसिंह म्‍हणाले होते

समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.
ही भयानक विषमता आणि जबरदस्‍तीने लादला गेलेला भेदभाव जगाला एका महाभयंकर उलथापालथीकडे घेऊन जाणे अटळ आहे. ही स्थिती अधिक काळ टिकून राहणे शक्‍य नाही. आजचा धनिक समाज एका भयंकर ज्‍वालामुखीच्‍या तोंडावर बसून चैनबाजी करीत आहे, व शोषकांची निरागस मुले आणि कोट्यावधी शोषित माणसे एका उंच कड्यावरून चालत आहेत, हे अगदी उघड आहे.
बॉम्‍ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन

कामगार बिगुल, जुलै 2018