Category Archives: पेरिस कम्यून

पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प दुसरे)

कामगार आदोंलनाचा एक मजबूत प्रवार होण्याअगोदरच समाजवादाचा विचार अस्तित्वात आला होता. परंतु याला “काल्पनिक” समाजवाद म्हटले गेले कारण त्यामागे काही ठोस वैज्ञानिक विचार व मार्गाची योग्य समज नव्हती. या काळातील बहुतांश  प्रगतिशील लोकांना आशा होती की यामुळे राजे-जहागिरदार-सामतांच्या अत्याचारांचा अंत होईल आणि विवेक, स्वातंत्र्य व न्यायाचे राज्य स्थापन होईल. वास्तवात सामंती अत्याचार व जोर जबरदस्तीची जागा निर्दय भांडवली शोषणाने आणि धनसंपत्तीच्या शासनाने घेतली. भांडवली विकासाच्या सुरुवातीच्या काळातच काही असे विचारक आणि दूरदृष्टे  लोक होते की त्यांनी भांडवली व्यवस्थेच्या अवगुणांना हेरले होते आणि एका चांगल्या व्यवस्थेसाठी आवाज उठवला होता की जी सगळ्यांसाठी न्याय व बंधुत्व या तत्वांवर उभी असेल.

पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प पहिले)

पण एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला कामगारांमध्ये ही चेतना नव्हती की त्यांच्या त्रासाला आणि संकटांना कोण जबाबदार आहे. अगोदर त्यांना असेच वाटले की मशिनींंमुळे त्यांची अवस्था इतकी असह्य झाली आहे. इंग्लंडच्या मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये—नॉटींघम, यॉर्कशायर, आणि लॅंकशायर मध्ये—1811मध्ये कामगारांनी मशीन नष्ट करण्याचे सुनियोजित अभियान चालू केले. या लोकांचा म्होरक्या ‘जनरल लुड्ड’ नावाचे एक काल्पनिक पात्र होते. असे म्हणतात की त्याचे नाव नेड लुड्ड या कामगाराच्या नावावरून पडले होते, ज्याने या आंदोलनाची सुरूवात केली होती. कामगारांच्या तुकड्या कारखाना मालकांच्या विरोधात हिंसक कारवाया करत, कारखान्यांना आग लावत, आणि मशिनींचे छोटे-छोटे तुकडे करत. पोलिस त्यांना थांबवण्यात अपयशी ठरले तेव्हा कारखाना मालकांच्या मागणीवरून सैन्याला पाचारण केले गेले.