पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (अकरावे पुष्प)

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या मार्च 2021 अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात केली आहे. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.

या लेखमालेतील सुरूवातीच्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणले की भांडवलाच्या सत्तेविरोधात कामगारांचा संघर्ष कशाप्रकारे पावलोपावली विकसित झाला. आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशी झाली आणि तिच्या रक्षणासाठी कामकरी जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. आपण हे सुद्धा पाहिले की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या तत्वांना इतिहासात पहिल्यांदा लागू कसे केले आणि हे पण दाखवले की “जनतेची सत्ता” वास्तवात कशी अस्ते. गेल्या पुष्पामध्ये आपण हे पहात होतो की कम्युनचा पराजय कोणत्या कारणांमुळे झाला. या चूकांनी नीट समजणे आणि भांडवलशाहीच्या विरोधात निर्णायक लढाईत त्यांच्यापासून धडे घेणे कामगार वर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे.

— संपादक मंडळ

  1. कम्युनच्या लाल झेंड्याखाली भांडवलशाही फौजे सोबत आर-पार लढताना पॅरिसचे कामगार आणि स्त्रिया.

    भांडवली व्यवस्थेची सभ्यता आणि न्याय आपले भयावह रूप तेव्हा दाखवतात जेव्हा तिचे गुलाम आणि काबाडकष्ट करणारे मालकांविरूद्ध लढण्यासाठी डोके वर काढतात. तेव्हा ही सभ्यता आणि न्याय, तिच्या नागड्या पाशविकतेच्या आणि बदला-घेण्याच्या खऱ्या स्वरूपात समोर येतात. मेहनतीचे फळ हडपण्यासाठी आणि उत्पादकांच्या वर्ग संघर्षाच्या प्रत्येक नव्या संकटात हे तथ्य अधिक नग्न स्वरूपात समोर येते. जून 1848 मध्ये कामगारांचे बंड चिरडण्यासाठी भांडवलदारांनी केलेले जालीम कारनामे सुद्धा 1871 च्या अमीट कलंकापुढे फिके पडले. आपले सर्व काही पणाला लावून ज्या धाडसाने आणि शौर्याने पॅरिसचे स्त्री-पुरूष आणि मुलंसुद्धा व्हर्साय-पंथियांच्या प्रवेशानंतर आठ दिवसापर्यंत लढले, ते ह्या गोष्टीचे प्रमाण आहे की ते कोणत्या मोठ्या धेयासाठी लढत होते. दुसरीकडे, व्हर्सायच्या सैनिकांचे नारकीय कृत्य त्या सभ्यतेच्या घृणास्पद आत्म्याला दाखवत होते, जिचे ते भाड्याचे नोकर होते

  2. भीषण युध्दादरम्यान थोडा आराम आणि पुढे लढाईची तयारी करताना पॅरिसचे कामकरी लोक.

    थियेर आणि त्याच्या खुनी कुत्र्यांच्या कर्तृत्वासारखी उदाहरणे फक्त जुन्या रोमन साम्राज्यामध्ये झालेल्या पाशवी हत्याकांडांमध्ये मिळतात. त्याच प्रकारचे भीषण हत्याकांड—त्याच उपेक्षेसहीत, मग कोणी म्हातारा असो, युवक ,पुरुष वा स्त्री. बंदिवानांना शारिरीक वेदना देण्याचा तोच पाशवी प्रकार, त्याच प्रकारचा मनमानी कारभार, परंतु यावेळी एका संपूर्ण वर्गाच्या विरोधात. रक्तपिपासू पध्दतीने फरार नेत्यांचा पाठलाग, जेणेकरून कोणीही पळून जावू शकू नये, त्याचप्रमाणे राजकीय आणि वैयक्तिक शत्रूंवर दोषारोपण, त्याच प्रकारे निरपराध लोकांची अंदाधूंद हत्या ज्याचा संघर्षाशी काहीही संबंध नव्हता. फरक एवढाच होता की, रोम लोकांजवळ बंडखोर लोकांच्या संपूर्ण टोळीला एकाच वेळी संपवणारे मशिनगन सारखे हत्यार नव्हते. याशिवाय रोम लोकांनी ना कायदा व न्यायाचे नाटक केले होते आणि ना सभ्यतेची पूर्ण हमी दिली होती.

  3. कम्युनच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे पॅरिसचे कामगार.

    कामगारांना चिरडण्याच्या या पाशवी अभियानाने भांडवली सभ्यतेचा भयंकर चेहरा उघडा पाडला. त्यांच्या स्वत:च्याच वर्तमानपत्रांनी या गोष्टीचे वर्णन केले आहे! लंडनच्या एका टोरी वर्तमानपत्राच्या पॅरिसमधील पत्रकाराने लिहिले की, “अशावेळी जेव्हा गोळीबाराचा आवाज अजून्ही कुठेतरी दूरवर गुंजत आहे, अभागी घायाळ ज्यांची कोणी देखभाल करू शकत नाही, पेयर-ला-शेजच्या दफनभूमीत जीव सोडत आहेत. 6,000 दहशतग्रस्त बंडखोर, निराशेने ग्रासून जमिनीतील तळघरांच्या भुलभुलैय्यामध्ये फिरत आहेत. मशिनगनच्या गोळ्यांनी एकावेळी वीसच्या संख्येने उडवून लावले जाण्यासाठी पकडले गेलेले अभागी तडकाफडकी सडकांवरून धरून आणले जात आहेत, दारू, बिलियर्डस आणि डोमिनोच्या शौकीनांची गर्दी, सजवलेल्या चौकात उभ्या असलेल्या दुराचारिणी स्त्रिया, फॅशनेबल हॉटेलांच्या अंत:कक्षांतून गुंजणारा आणि रात्रीची शांतता भंग करणारा विलासी उल्हासाचा आवाज घृणा उत्पन्न करत आहे.

  4. कम्युनला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोवियत संघात काढलेले टपाल तिकीट

    कम्युनच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभ्या केलेले बॅरिकेड्सची खूप मोठी भुमिका होती. वरील चित्रात जनतेने बनवलेले एक यंत्र दाखवले आहे, ज्याचा वापर बॅरिकेड बनवण्यासाठी होत होता. वरील डाव्या बाजूला–एका बॅरिकेड सोबत एक नॅशनल गार्डचा योध्दा, लाल झेंड्यासोबत.

    जुर्नाल द पॅरिस’ नावाच्या व्हर्सायपंथी वर्तमानपत्रामध्ये, ज्याला कम्युनने बंद केले होते, श्री. एडुअर्ड एर्वे यांनी लिहिले आहे: “पॅरिसच्या जनतेने ज्या पध्दतीने आपली संतुष्टता व्यक्त केली, त्यामध्ये तुच्छतेचा आवश्यकतेपेक्षा जास्त आभास होता आणि आम्हाला भय आहे की वेळ जसा-जसा जाईल तस-तसा तो वाढत जाईल. पॅरिसमध्ये आता जी उत्सवाची भडकता आहे ती अतिशय अनुपयुक्त आहे; ही गोष्ट आता संपली पाहिजे नाही तर लोक आम्हाला पतनोन्मुख पॅरिसवासी म्हणतील.” यानतंर त्यांनी त्यांचा जुना लेख तासितुस मधली एक उक्ती उधृत केली. “परंतु त्या भीषण संघर्षाच्या पुढच्या सकाळीच, जेव्हा संघर्ष पूर्णपणे संपला नव्हता, पतित आणि भ्रष्टाचारी रोम परत एकदा व्यभिचाराच्या त्या चिखलात लोळायला लागले, जो त्याच्या शरिराला नष्ट आणि आत्म्याला भ्रष्ट करत होता.” एर्वे एवढेच म्हणायला विसरले की, ज्या “पॅरिसच्या जनते”ची गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे थियेरची, व्हर्साय आणि आजूबाजूने परत येणाऱ्या झुंडीच्या-झुंडी धुर्त लोकांची, म्हणजेच पतनोन्मुख पॅरिसच्या जनताची गोष्ट आहे.

  5. कामगारानी जुन्या शासनातील दमनाच्या सर्वात मोठ्या प्रतिकाला, ‘गिलोतिन’ला, तोडून टाकले. परंतु ते शोषणाच्या जुन्या व्यवस्थेला मुळापासून उखडून नाही टाकू शकले. हे काम त्यांच्या येणाऱ्या पुढील पिढीला करायचे आहे.

    मेहनतीच्या गुलामीवर आधारित ही घृणास्पद सभ्यता जेव्हा-जेव्हा नव्या श्रेष्ठ समाजाच्या आत्मत्यागी समर्थकांवर रक्तरंजित विजय प्राप्त करते, तेव्हा ती पराजितांच्या कण्हण्याला कुत्सित-प्रचाराच्या पुरामध्ये बुडवते आणि हा कुत्सित-प्रचार संपूर्ण जगात पसरवला जातो. कामगारांद्वारे प्रशासित पॅरिस जेथे कम्युनचे राज्य होते, ‘व्यवस्थेच्या’ खुनी कुत्र्यांद्वारे अव्यवस्था आणि हिंसेंचे शहर बनवले जाते. आणि जगातील सर्व देशातील भांडवली मेंदूंसाठी हे एक जबरदस्त परिवर्तन काय असते? हेच की कम्युनने सभ्यतेच्या विरूध्द षडयंत्र केले होते! कम्युनसाठी पॅरिसची जनता इतक्या मोठ्या संख्येने उत्साहपूर्वक आपल्या प्राणांचा बळी देत होती ज्याचे इतिहासात दुसरे उदाहरण नाही. यातून काय सिद्ध होते? हेच की कम्युन जनतेचे सरकार नव्हते तर मूठभर अपराध्यांची अनौरस औलाद होती! पॅरिसच्या कामगार स्त्रिया हसत-हसत सडकेवरील लढ्यात आणि फाशीच्या तख्तावर आपले प्राण अर्पण करत होत्या. हे काय सिद्ध करते? हेच की कम्युनरूपी राक्षसाने त्यांना लढावू राक्षसणी बनवले. जितक्या शौर्याने कम्युनने स्वत:च्या रक्षणासाठी लढाई केली तेवढीच त्यांनी दोन महिने एकछत्र शासनात नरमाई सुद्धा दाखवली. यातून काय सिद्ध होते? हेच की कम्युनने अनेक महिने कोमलता आणि मानवतेच्या छद्मी आवरणाखाली आपल्या रक्तलोलुप राक्षसी हिंसक प्रवृत्तीला लपवले होते.

  6. भांडवलदारांनी कामगारांच्या रक्तरंजित दमनात जुलुमशाहीची सगळी हद्द पार केली; परंतु जेव्हा कामगारांनी मागे हटताना आपल्या आत्मरक्षणासाठी काही इमारतीना आग लावली, तेव्हा भांडवलदारांचे नेते आणि वर्तमानपत्र यांला क्रूरता म्हणत ओरडायला लागले.

    भांडवलदारांनी या गोष्टीवर खूप आरडा-ओरडा केला की कामगारानी पॅरिसच्या इमारतींना आग लावून बर्बाद केले. आजही बुर्झ्वा प्रसारमाध्यमे कम्युनच्या इतिहासात पॅरिसच्या बर्बादीला सगळ्यात मोठ्या घटनेच्या रूपात दाखवतात. पण सत्य काय होते? कामगारांच्या पॅरिसने जेव्हा शौर्याने आपले बलिदान देण्यास सुरवात केली तेव्हा त्यांनी इमारती आणि स्मारके यांनाही आगीच्या ज्वाळांमध्ये भस्म होऊ दिले. कामगारांच्या शरिराचे तुकडे–तुकडे करताना शासकांनी आगी कडून ही आशा नव्हती ठेवली पाहिजे की ते विजयी होऊन जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांच्या इमारती खात्रीने उभ्या असतील. व्हर्सायच्या सरकारने “जाळपोळी”चा आरडा-ओरडा केला आणि दूरवरच्या गावांपर्यंत आपल्या गुंडांना संकेत दिले की त्यांनी शत्रूला व्यावसायिक जाळपोळ करणारे म्हणून पकडावे. मार्क्सने लिहिले, “सगळ्या जगातील भांडवलदार, जे युध्दानंतर होणाऱ्या सामुहिक हत्याकांडांबाबत हु की चु नाही करत, विटा आणि भिंतींची पवित्रता नष्ट झाल्यावर थरथर कापून उठताहेत!”

  7. मे 1871 च्या दिवसात झालेल्या भीषण लढाईत नष्ट झालेल्या पॅरिसच्या इमारती. युध्दात आगीचा वापर तेवढाच वैध आहे जितका इतर एखाद्या हत्याराचा असू शकतो. ज्या इमारतींवर शत्रूचा ताबा असतो, त्या इमारतींना आग लावण्यासाठी तोफगोळे टाकले जातात. जर आत्मरक्षकांना मागे हटावे लागले तर ते स्वत: आग लावत जातात, जेणेकरून आक्रमणासाठी त्यांचा वापर केला जावू नये. सगळ्या जगातील नियमित सेनेच्या युद्धक्षेत्रातील घरांचे कमनशिब होते की ते आगीत जाळले गेले. परंतु शोषकांच्या विरूद्ध शोषितांच्या युध्दात, जे इतिहासातील एकमात्र न्यायपूर्ण युद्ध आहे, नेहमी हे म्हटले जाते की येथे हा नियम लागू होत नाही.

    रक्ताची होळी खेळताना आपल्या शिकारीविरूध्द कुत्सित प्रचाराचे वादळ सोडणे ही शासक वर्गाची जुनी रीत आहे. या बाबतीत भांडवलदार वर्ग जुन्या जमान्यातील सामंताचेच वारस आहे, जे समजत होते की सामान्य जनतेच्या विरूद्ध कोणत्याही हत्याराचा वापर वैध आहे, परंतु सामान्य जनतेच्या हातात कोणत्याही प्रकारचे हत्यार असणे अवैध आहे.

    कम्युनने आगीचा वापर अगदी सोळा आणे स्वरक्षणाचे साधन म्हणून केला. त्यांनी याचा वापर व्हर्सायच्या फौजेसाठी त्या मोठ्या मार्गांना बंद करण्यासाठी केला, ज्यांना व्हर्सायचे जनरल ओस्मान यांनी जाहीरपणे तोफांच्या माऱ्यासाठी खुले सोडले होते. कामगार मागे हटत असताना आपल्या बचावासाठी आगीचा त्याच प्रकारे वापर करत होते, ज्या प्रकारे व्हर्सायचे सैनिक पुढे येण्यासाठी तोफांच्या गोळ्यांचा वापर करत होते, ज्यात कमीत कमी तेवढीच घरे उध्वस्त झाली जेवढी कम्युनव्दारे लावलेल्या आगीने झाली. हे कधीच समोर आले नाही की कोणती घरे आत्मरक्षकांनी जाळली आणि कोणती आक्रमण करणाऱ्यांनी जाळली. आणि आत्मरक्षकांनी आगीचा वापर तेव्हाच केला जेव्हा व्हर्सायच्या फौजेने बंदिवानांची अंदाधूंद कत्तल करणे चालू केले. याशिवाय कम्युनने खूप आधीच सार्वजनिक रूपात या गोष्टीची घोषणा केली होती की, जर त्यांना शेवटपर्यंत मजबूर केले गेले तर ते स्वत:ला पॅरिसच्या ढिगाऱ्यामध्ये गाडून घेतील. कम्युनला माहित होते की त्यांच्या विरोधकांना पॅरिसच्या जनतेच्या जीवाची पर्वा नाही, पण त्यांना त्यांच्या पॅरिस मधील इमारतींची काळजी आहे.

  8. “कम्युनचे सिद्धांत शाश्वत आणि अनश्वर आहेत. जो पर्यंत कामगार वर्ग मुक्त होत नाही, तो पर्यंत हे सिद्धांत वारंवार प्रकट होत राहतील.”
    — कार्ल मार्क्स

    ज्याच्यांत काही महिने नुकतेच भीषण युद्ध चालू होते, ते प्रशिया आणि फ्रांसचे भांडवलदार पॅरिस कम्युनला चिरडल्यानंतर एक झाले. हा या गोष्टीचा पुरावा आहे की जसा वर्ग-संघर्ष गृह-युद्धामध्ये बदलतो, तसा राष्ट्रीयतेचा बुरखा उतरवला जातो. कामगार वर्गाच्या विरूद्ध सर्व राष्ट्रीय सरकारे एकत्र होतात. या गोष्टीची 1917 मध्ये पुन्हा पुनरावृत्ती झाली, जेव्हा सोवियत संघात कामगारांची सत्ता कायम होताच, 16 देशातील सरकारांनी मिळून त्यावर हल्ला केला.

  9. 1871 पॅरिस कम्युनच्या दमनाने हे सुद्धा सिद्ध केले की, कामगार आणि त्यांच्या उत्पादनाला हडपणाऱ्यांमध्ये आता स्थायी शांती किंवा युध्दविराम होऊ शकत नाही. लढा वारंवार आणि उत्तरोत्तर वाढणाऱ्या रूपात अनिवार्यपणे छेडला जाईल आणि यामध्ये संशयाला जागा नाही की शेवटी कोणाचा विजय होईल—मुठभर लुटखोरांचा की बहुसंख्याक कामगार वर्गाचा. कार्ल मार्क्सच्या शब्दात “कामगारांचे पॅरिस आणि त्यांची कम्युन नव्या समाजाच्या गौरवशाली पथदर्शकाच्या रूपात नेहमी यशस्वी राहील. कम्युनच्या शहीदांनी कामगार वर्गाच्या विशाल हृदयात आपले स्थान बनवले आहे. कम्युनला नष्ट करणाऱ्यांना इतिहासाने चिरकालासाठी अपराध्याच्या त्या पिंजऱ्यात बंद केले आहे, ज्यातून त्यांच्या पाद्र्यांनी केलेल्या सर्व प्रार्थनाही सोडवू शकणार नाहीत.”

…पुढील अंकात चालू