Category Archives: Slider

एका गोभक्ताची भेट – हरिशंकर परसाई

आंदोलनासाठी विषय बरेच आहेत. सिंह दुर्गेचे वाहन आहे. त्याला सर्कसवाले पिंजऱ्यात डांबतात. त्याचे खेळ करतात. हा अधर्म आहे. सर्कसवाल्यांच्या विरोधात आंदोलन करून देशातच्या सगळ्या सर्कस बंद करून टाकू. मग देवाचा आणखी एक अवतार आहे, मत्स्यावतार. मासा देवाचे प्रतीक आहे. माच्छिमारांच्या विरोधात आंदोलन पुकारू. सरकारचा मासेपालन विभागच बंद करून टाकू. बच्चा, जोपर्यंत लूट संपत नाही, तोपर्यंत काही लोकांच्या अडचणी संपणार नाहीत. एक मुद्दा आणखी आहेच बच्चा. आम्ही जनतेत पसरवू, की आपल्या धर्माच्या लोकांच्या सगळ्या अडचणींचे कारण दुसऱ्या धर्माचे लोक आहेत. या ना त्या प्रकारे आम्ही जनतेला धर्माच्या नावाखाली गुंतवून ठेवूच बच्चा.