भीमा कोरेगाव लढाईच्या २०० वर्ष साजरीकरणाचा सोहळा – जाती-अंताची योजना अशा अस्मितावादामूळे पुढे नाही, उलट मागे जाईल!
भारतातील जनतेला कायम विभाजित ठेवण्यासाठी इंग्रजांनी जाती व्यवस्थेचा आणि धर्माचा वापर केला होता. इंग्रजांनी जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी अगदी जाणीवपूर्वक अजिबात काही खास केले नाही. अशा स्थितीत जर कोणी स्वत:ला जातीअंताचे आंदोलन म्हणत असेल (रिपब्लिकन पॅंथर) आणि कोरेगावच्या लढाईचे २०० वे वर्षे साजरे करत असेल तर स्वाभाविकच ते असेही म्हणत असतील कि इंग्रजांचे सैनिक हे जाती अंताचे शिपाई होते. वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. अशा संघटना ना जाती अंताची कुठली सांगोपांग योजना देवू शकतात, ना त्यावर दृढपणे अंमलही करू शकतात.