कामगार वर्गाच्या स्वतंत्र क्रांतीकारी प्रतिनिधीत्वाचा प्रश्न
आज देशभरांत बुर्झ्वा निवडणूकांमध्ये कामगार वर्गाच्या स्वतंत्र क्रांतीकारी पक्षाचं प्रतिनिधीत्व करणारी कुठलीच पार्टी अस्तित्वात नाही आहे. एका बाजूला डावी दुस्साहसवादी कार्यदिशा आहे. जी भांडवली निवडणूकांवर बहिष्काराची घोषणा देते आहे. तर दुसरीकडे सुधारणावादी, दुरुस्तीवादी नकली कम्युनिस्ट पक्ष आहेत, ज्यांचं राजकारण वस्तुत: भांडवली व्यवस्थेच्या शेवटच्या सुरक्षा रांगेचे काम करत आहेत. अशामध्ये या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांमध्ये कामगार वर्गाचं अजिबात प्रतिनिधीत्व नाही. त्याच्या परिणामी कामगार वर्गाचा एक मोठा हिस्सा भांडवली पक्षांच्या मागे जायला मजबूर आहे. याचे नुकसान फक्त राजकीयच आहे असं नाही तर विचारधारात्मक सुद्धा आहे.