लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त (26 ऑक्टोबर) त्यांची काही निवडक उद्धरणे

  1. ‘आपल्या देशात धर्माच्या नावाखाली काही निवडक लोक आपले निकृष्ट हितसंबंध साध्य करण्यासाठी लोकांना आपआपसात भांडवतात. धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा भयंकर व्यापार रोखण्यासाठी धैर्य व चिकाटीने काम केले पाहिजे.’
  2. ‘एकीकडे, जेथे जनआंदोलन आणि राष्ट्रीय चळवळ होती, त्याच वेळी त्यांच्याबरोबरच जातीय आणि जातीयवादी चळवळी जाणीवपूर्वक सुरू केल्या गेल्या कारण या चळवळी ना इंग्रजांच्या किंवा कोणत्याही वर्गाच्या विरोधात नव्हत्या, तर इतर जातींच्या विरोधात होत्या.’
  3. ‘काही लोक हिंदू राष्ट्र – हिंदु राष्ट्र’ हा जयघोष करतात. आम्ही नाही म्हटले तर आम्हाला माफ करा. आपण यावर भर देऊयात की ते एक मोठी चूक करत आहेत आणि त्यांना अद्याप राष्ट्र या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. आम्ही भविष्यवेत्ते नाही, पण ही अवस्था आपल्याला सांगते आहे की यापुढे जगात हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही.’
  4. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा सुरू होता, त्यातील तो दिवस अगदीच वाईट होता ज्या दिवशी खिलाफत, मुल्ला, मौलवी आणि धर्माचार्यांना स्वातंत्र्याच्या क्षेत्रात स्थान देणे आवश्यक समजले गेले. एक प्रकारे, त्या दिवशी आम्ही स्वातंत्र्याच्या क्षेत्रात एक पाऊल मागे टाकले. आपल्या त्याच पापांची फळे आपल्याला भोगावी लागत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या ह्या चळवळीनेच मौलाना अब्दुल बारी आणि शंकराचार्य यांना देशासमोर वेगळ्या स्वरूपात मांडून अधिक सामर्थ्यवान बनविले आणि ह्या कार्याचा परिणाम असा झाला आहे की या वेळी आपल्या हातांनी वाढवलेली ह्यांची व ह्यांच्या सारख्या लोकांची शक्ती आपलीच मुळं उखडून टाकण्याचे आणि देशात धार्मिक वेडेपणा, भांडखोरपणा आणि धार्मिक उत्पाताचे राज्य स्थापित करण्याचे काम करत आहे.’
  5. ‘लेनिनच्या अपूर्ण ग्रंथांची पाने केवळ रशियामध्येच नाही, सर्वत्र लिहिली जात आहेत. उठाव होतील, बदलांचे प्रवाह बदलतील, जुना आततायी पणा गळून पडेल.’

 

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020