14 मार्च, कार्ल मार्क्स यांच्या 140 व्या स्मृतिदिनानिमित्त
जगाला कामगारांच्या सत्ता स्थापनेचं एक उदात्त, महत्तम स्वप्न, एक घनगंभीर लक्ष्य देणारा आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी एक विज्ञाननिष्ठ रस्ता दाखवणारा व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स! आज जगभरात कामगार वर्गीय बाजू निवडणारी, कष्टकऱ्यांची श्रम संस्कृती स्वतःत रुजविण्याचा प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती घट्ट मूठ वळून, पाठीचा कणा ताठ करून, हात वर उचलून तितक्याच जिद्दीने एक नारा देते जितक्या जिद्दीने मार्क्स हा नारा देत असे – ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’