जगभरातील कामगारांचे शिक्षक व चीनी क्रांतीचे महान नेते माओ यांच्या पुण्यतिथि (९ सप्‍टेंबर) निमित्त

Mao• कम्युनिस्टांनी नेहमीच सत्याची बाजू उचलून धरायला हवी, कारण प्रत्येक सत्य हे जनतेच्या हिताचे असते. कम्युनिस्टांनी सदा सर्वदा आपल्या चुका सुधारण्यास तयार राहिले पाहिजे, कारण चुका जनतेच्या हितांच्या विरूद्ध असतात.
माओ त्से तुङ (युती सरकारसंबंधी) २४ एप्रिल १९४५
• कम्युनिस्टांनी दूरद्रष्टे बनायला हवे, आत्मबलिदानासाठी सर्वांत जास्तत तयार राहायला हवे, सर्वाधिक खंबीर बनायला हवे, परिस्थिती ओळखण्यात भांडवलदारांहून कणभरही कमी असता कामा नये, तसेच त्यांनी बहुसंख्य सामान्य जनतेवर विश्वास करायला हवा व त्यांचा पाठिंबा मिळवायला हवा.
माओ त्से तुङ (जपानी आक्रमणाच्या काळात चिनी कम्युनिस्ट पार्टीची कर्तव्ये) ३ मे १९३७
• प्रत्येक कम्युनिस्ट हा बीजासारखा असतो, आणि जनता भूमीसारखी. आपण जेथे जेथे जाऊ, तेथे जनतेबरोबर एकता निर्माण केली पाहिजे, आपली मुळे त्यांच्यात खोलवर रुजवली पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये बहरले पाहिजे.
माओ त्से तुङ (छुङकिङ संधी बोलणीसंबंधी) १७ ऑक्टोबर १९४५
• सर्वच गोष्टींबाबत जनतेशी एकरूप होण्याची क्षमता आपण कम्युनिस्टांमध्ये अवश्य असली पाहिजे. आपले पार्टी सदस्य जर बंद खोलीत बसून उभे आयुष्य काढणार असतील आणि जगाचा सामना करण्यासाठी व वादळांना तोंड देण्यासाठी कधी बाहेर पडणार नसतील, तर त्याने चिनी जनतेचे काय भले होणार आहे? कणभरसुद्धा नाही, आणि अशा प्रकारचे पार्टी सदस्य आपल्याला नको आहेत. आपण कम्युनिस्टांनी जगाचा सामना केला पाहिजे, वादळांना तोंड दिले पाहिजे, हे जग लोक संघर्षांचे विशाल जग आहे आणि हे वादळ लोक संघर्षांचे जबरदस्त वादळ आहे.
माओ त्से तुङ (संघटित व्हा) २९ नोव्हेंबर १९४३
• कम्युनिस्टाने कधीच हेकटी असता कामा नये, त्याने इतरांवर मते लादू नयेत. आपण प्रत्येक गोष्टीत प्रवीण आहोत आणि इतरांना मात्र काहीच येत नाही, असे त्याने कधीच समजू नये, त्याने स्वतःला आपल्या छोट्याशा खोलीता बंद करून घेता कामा नये, मोठमोठ्या बाता मारू नयेत व अधिकार गाजवू नये.
माओ त्से तुङ (शेनशी कानसू निड्या सीमान्त क्षेत्रात प्रतिनिधी सभेत भाषण) २१ नोव्हेंबर १९४१

कामगार बिगुल, सप्‍टेंबर २०१५