‘गोरक्षक’ गुंडांच्या आतंकाविरोधात मुंबई येथे विरोध प्रदर्शन
दिनांक १ एप्रिल रोजी राजस्थानमधील एका मुस्लीम शेतकऱ्याची काही ‘गोरक्षक’ गुंडानी निर्दयीपणे हत्या केली. झाले असे की हरियाणा येथील मेवातमधील शेतकरी ‘पहलू खान’ या दिवशी जयपुरच्या प्रसिद्ध हटवाडा येथील गुरांच्या बाजारातुन ‘दुग्ध’ व्यवसायासाठी गाय विकत घेत होते. पहलू खान यांची एकच चुक होती, ती म्हणजेच ‘मुस्लीम’ असणे. स्वत:ला गोरक्षक म्हणनाऱ्या जातीयवादी गुंडानी त्यांना थोडे पुढे जाऊ दिले आणि त्यानंतर लगेचच त्यांना पकडले व मारायला सुरवात केली. ह्या मारझोडीतच पहलू खान यांचा मृत्यू झाला.
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. आणि शेवटची सुद्धा नसणार असे दिसते. या घटनेच्या विरोधात दिनांक १५ एप्रिल रोजी अंधेरी रेल्वे स्टेशन (पूर्व) येथे नौजवान भारत सभा, बिगुल मजदूर दस्ता तसेच इतर संघटनांनी विरोध प्रदर्शन केले. विरोध प्रदर्शनाच्या सुरवातीला काही क्रांतीकारी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर नौजवान भारत सभेचे सत्यनारायण यांनी आपले म्हणने मांडले. सुरवातीला त्यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती उपस्थित लोकांना सांगितली व ते पुढे म्हणाले, मागच्या काही दिवसांपासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस ह्या संस्थेशी संलग्न असणाऱ्या काही संघटनानी भावनांना भडकावून जागो जागी गोरक्षेच्या नावाखाली गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या आहेत. ‘इंटरनेटवर’ ह्या गुंड प्रवत्तीच्या टोळ्या लोकांची निर्घृण पद्धतीने मारझोड असलेले व्हीडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत करत आहेत तरी देखील त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही. हे व्हीडीओ इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनांच्या व्हीडीओसारखेच आहे. ते म्हणाले की ह्या सगळ्याच प्रसंगावरून हाच प्रश्न निर्माण होतो की खरच त्यांचे ध्येय हे गायांची सुरक्षा करणे हेच आहे का? ज्या-ज्या राज्यांमध्ये गोरक्षेचे कायदे लागु झाले आहेत तिथेच गोरक्षक टोळक्यांचा आतंक वाढला आहे. म्हणून तेथील शेतकऱ्यांनी गायी सोडून ‘म्हशी’ पाळायला सुरवात केली आहे. ह्यावरून असे लक्षात येते की, ह्या सगळ्या गोरक्षावादी गुंडशाहीच्या मागे कोणत्याच बाजूने असे दिसत नाही की, यांना गायींचे भले करायचे आहे. उलट समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी यावरून ध्यान भटकवणे हेच आहे. अशा कठीण परिस्थितीत आर्थिक मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार कधी गोरक्षा तर कधी लवजिहाद तर कधी राममंदिर असले भावनात्मक मुद्दे वारंवार चर्चेत आणून जनतेला गंडवत आहे. हे नाव तर हिंदुधर्माचे घेतात परंतु यांचा खरा धर्म अडाणी, अंबांनी, जिंदल, मित्तल यांचा नफा वाढवणे हा आहे. ज्या-ज्या वेळी हे धर्माचे नाव घेवुन येतील तेव्हा त्यांना आर्थिक नितींबाबत विचारणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की, जर आपण आज यांच्या कटकारस्थानाला त्वरित ओळखले नाही तर याची किंमत आपल्या येणाऱ्या पिढ्या चुकवतील. एवढे बोलुन सत्यनारायण यांनी आपले मनोगत संपवले. त्यानंतर तेथील उपस्थित लोकांना हजारो पत्रके वाटण्यात आली. प्रदर्शनाचा समारोप क्रांतीकारी घोषणांनी झाला.
कामगार बिगुल, एप्रिल २०१७