सावधान! सावधान! सावधान!
गुंगीचे विषारी खुराक चारणाऱ्या टोळीपासून सावधान…!!!

नौजवान भारत सभा

सर्वांना सुचित करण्यात येत आहे की बऱ्याच काळापासून एक टोळकं मेंदूला गुंगीचे विषारी खुराक चारून देशातील जनतेची लूट करत आहे. ज्या प्रकारे बस-ट्रेन मध्ये अगोदर लोकांशी मैत्री करून, नंतर मिठाईतून गुंगीचे औषध चारून त्यांना लुटणाऱ्या टोळ्या काम करतात, त्याचप्रकारे या टोळीचे लोक अगोदर सबका साथ-सबका विकास, प्रत्येकाला 15 लाख अशा जुमल्यांनी लोकांना लाडी लावून आणि नंतर देशभक्ती, गोमाता, भारत माता, राम मंदिर यांच्या मिठाईत घातलेले आपले गुंगीचे औषध लोकांना चारून त्यांना बेशुद्ध करत आहेत. बस-ट्रेन मधल्या गुंगीच्या औषधाचा परिणाम आपल्यावर 24 तास काय तो राहतो, पण या नवीन टोळक्याच्या गुंगीच्या औषधाच्या विषाचा परिणाम किती दिवस राहील हे सांगणं कठीण आहे. याचा इलाज जर वेळेत केला नाही तर आपला देश आणि पिढ्यान-पिढ्या बरबाद होऊ शकतात.

पूर्वी या टोळीला ‘चड्डी गॅंग’ किंवा ‘चड्डीबनियान टोळी’ या नावाने ओळखले जात होते. पण आता विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की यांनी चड्डीच्या ऐवजी ‘विजार’ वापरण्यास सुरुवात केली आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेला सावधान करण्यात येत आहे की, नवीन पॅकिंग बघून धोका खाऊ नका, कारण आतला माल जुनाच आहे!

जर तुम्हाला तुमच्या आसपास या टोळीच्या विषाने प्रादुर्भाव झालेला एखादा इसम दिसला तर बिलकुल डोळेझाक करू नका. त्या इसमाला योग्य उपचाराची गरज आहे. या विषयुक्त खुराकाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत- स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही इ. तत्त्वाच्या गोष्टी ऐकताच चेहरा लाल होणे, तोंडावाटे फेसाबरोबर शिव्यांचा रतीब सुरू होणे, एका तर्काच्या उत्तरात 50 कुतर्काबरोबरच मोठ्या आवाजात ओरडणे, इ. नेहमी दिसून आले आहे की, असल्या रोग्याला आजच्या सद्यपरिस्थिती बाबत काही जरी विचारले तर तो 3, 10, 70, 1000 वर्षांपूर्वींच्या या ना त्या फालतू गोष्टींबाबत बरळण्यास सुरवात करतो.
या जहाल विषयुक्त खुराकाच्या उताऱ्याची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.
तत्पूर्वी आपल्या देशाला असले गुंगीचे विषारी खुराक देणाऱ्या टोळीपासून वाचवण्यासाठी हा संदेश नक्कीच फॉरवर्ड करा.
देशहितासाठी प्रसारित
नौजवान भारत सभा

 

कामगार बिगुल, जुलै 2018