टी.आर.पी. घोटाळा: डाळीत काळंबेरं नाही, डाळच काळी आहे!
सगळीकडे फक्त बोलले जाते की मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे वगैरे. पण भारतातील आणि जगातील प्रसारमाध्यमांचा इतिहास हेच दाखवतो की त्याने कधीही जनतेच्या आणि कामगार वर्गाच्या खऱ्या हितांचे कधीही प्रतिनिधित्व केले नाही. आपण ऐकले असेल की आणीबाणीच्या काळात मीडीयावर बंधने आली होती, सेन्सरशीप लागू होती, हे खरे आहे, पण यापेक्षा मोठे वास्तव हे आहे की खुल्या किंवा छूप्या पद्धतीने नेहमीच कामगार वर्गाचा आवाज गायब करणे हेच मीडीयाचे काम राहिले आहे.