Category Archives: समाजवादी प्रयोग

समाजवादी सोविएत संघाने वेश्यावृत्ती कशी संपुष्टात आणली?

रशियामध्ये समाजवादी काळात नशाखोरी आणि वेश्यावृत्तीसारख्या समस्यांच्या विरोधात लढा पुकारण्यात आला आणि या प्रवृत्ती नष्ट करण्यात यशही मिळाले. त्या काळात अवलंबिण्यात आलेले धोरण फक्त यामुळे यशस्वी झाले नाही की जारशाहीनंतर एक इमानदार सरकार सत्तेत आले होते. या समस्या सोडवण्यात यश येण्याचे खरे कारण हे होते की या अपप्रवृत्तींचे मूळ खाजगी मालकीवर आधारित संरचना रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या (बोल्शेविक) नेतृत्त्वाखाली झालेल्या ऑक्टोबर १९१७ च्या क्रांतीने नष्ट करून टाकली. उत्पादनाच्या साधनांवर समान मालकी असल्यामुळे उत्पादनसुद्धा समाजाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून केले जात होते. काही मूठभर लोकांच्या नफ्यासाठी नाही. म्हणूनच सोविएत सरकारद्वारा बनवलेली धोरणेसुद्धा बहुसंख्याक कष्टकरी जनतेला लक्षात घेऊन केली जात होती, मूठभर लोकांच्या नफ्यासाठी नाही.

समाजवादी रशिया आणि चीनने व्यसनबाजीचे उन्मूलन कसे केले?

समाजाला व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले आहेत. परंतु नशेच्या ह्या दलदलीत समाज अधिकच आत ओढला जात आहे. वेगवेगळ्या देशांमधील सरकारे, समाजसेवी संस्था आणि ह्या नफा-केंद्रित व्यवस्थेच्या सेवेत गुंतलेले बुद्धीजीवी या समस्येवर ह्याच व्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहून विविध उपाय सुचवत असतात. त्या उपायांची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली आहे. परंतु समाजातील व्यसनांचा प्रादुर्भाव रोखण्यात हे सर्व मार्ग अपयशी ठरले आहेत. परंतु मानवी समाजाच्या इतिहासामध्ये एक सुवर्णकाळ असाही होता ज्यात व्यसन आणि शरीर-विक्रय यांसारख्या सामाजिक समस्या पूर्णपणे संपवण्यात आल्या होत्या. हा काळ होता रशिया आणि चीन मधील समाजवादी काळ.