भांडवलाच्या गुलामी पासून मुक्ततेसाठी बॉलीवूड चित्रपटांची नव्हे तर कामगारांच्या संघर्षाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे!
मित्रांनो, जर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ह्या दमघोटू वातावरणातून मुक्त करून त्यांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ देऊ इच्छित असू तर आपल्याला आपला गौरवशाली इतिहास जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी गरजेचे आहे की आपण आपला रिकामा वेळ ह्या लोकांचे फालतू चित्रपट बघण्यात वाया घालवण्यापेक्षा अशी पुस्तके किंवा साहित्य वाचण्यात घालावा जी आपल्याला आपल्या अधिकारांबद्दल जागरूक करण्यास मदत करतील.