महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा अमर रहे!
25 ऑक्टोबर (क्रांत्योत्तर नवीन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर) 1917 रोजी लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या पुढाकाराने रशियातील कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता उलथवून टाकली आणि 1871 च्या पॅरिस कम्युन नंतर पुन्हा कामगार वर्गीय सत्तेची स्थापना केली. या घटनेने ना फक्त रशियाच्या इतिहासाला नवीन वळण दिले, तर जगाच्या इतिहासावर कायमची अमिट छाप सोडली आणि इतिहासाच्या संपूर्ण कालक्रमालाच कलाटणी दिली. ऑक्टोबर क्रांतीच्या तोफगोळ्यांचे आवाज जगभर घुमले.