सरकारी योजनांच्या निव्वळ पोकळ घोषणा ! टाळेबंदीमध्ये कामगार उपाशीच!
टाळेबंदी जाहीर करताना सरकारने कामगार-कष्टकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना दिसलेली नाही. केलेल्या सर्व घोषणा पोकळ आहेत, फक्त कागदावरच आहेत, आणि प्रत्यक्षात मात्र सरकारने कामगार-कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे! काही कामगारांनी प्रत्यक्ष दिलेली माहिती आणि उपलब्ध आकडेवारीवरून ही स्पष्ट होते.