Tag Archives: अश्विनी

कोट्यवधी कामगार-कष्टकऱ्याची मुलं शिक्षणासह खेळापासूनही वंचित! मग ऑलिपिकमध्ये मेडल कुठून येणार?

आतापर्यंत एकूण फक्त 41 पदके भारताने मिळवली आहेत. त्यात सामूहिक खेळात हॉकीने मोठी बाजी मारली तर वैयक्तिक खेळांमध्ये नेमबाजी, शर्यत, कुस्ती, वेटलिफ्टींग अशा विविध खेळांमध्ये पदके मिळवली. पण तरीही 140 कोटी लोकसंख्या आणि इतर भौगोलिक परिस्थितीच्या मानाने भारताने मिळवलेल्या पदकांची संख्या एवढी कमी का? हा प्रश्न उपस्थित होतोच.

शहराला चमकवणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कधी?

पुण्यातील अप्पर इंदिरा नगर, शहराच्या कडेचा भाग. अर्थातच मध्यवर्ती शहराला स्वच्छ, चकचकीत ठेवणारे, श्रीमंतांसाठी फ्लॅट्स बांधणारे, त्यांच्या गाड्या बनवणारे, त्यांच्या घरात घरकामासाठी स्वस्तात राबणारे कामगार राहतात त्या वस्त्या.

लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पाडले!

28 मे रोजी दिल्लीमध्ये शाहबाद डेअरी येथे 16 वर्षीय साक्षी एका बर्थडे पार्टीला जात असताना तिचा पूर्वीचा मित्र साहिलने रस्ता अडवून तिची हत्या केली. 28 मे ला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघ भाजपच्या विविध संघटना म्हणजे आरएसएस, बजरंग दल मिळून घटनेला धार्मिक वळण देण्यासाठी खोटा प्रचार घेऊन वस्तीत आले. साहिल मुस्लिम धर्मातून येत होता आणि साक्षी हिंदू, म्हणून हे लव जिहादचे प्रकरण होतं, ह्याप्रकारचं धार्मिक विष पेरत उजव्या संघटना सक्रिय झाल्या. त्यावेळेस भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या (आर.डब्ल्यु.पी.आय.) नेतृत्वात स्थानिक जनतेनेच या प्रकरणात साहिलला शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु अशा घटना अगोदरही होत आल्यात, आणि इथे धर्माचा काही संबंध नाही ही भुमिका घेत धर्मांध प्रचारकांना हाकलून लावले.

हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांची निर्दोष मुक्तता!!

सीबीआय तपासणी, मुलीचं मरणाआधीचं वक्तव्य, सर्व पुरावे समोर असून देखील बलात्कारच झाला नाही हा निर्णय कोणाच्या दबावात दिला गेला?  कोणाच्या सरकारमध्ये हे सगळे घडले, तर अर्थातच महिला सशक्तीकरणाचे ढोल बडवणाऱ्या भाजपच्या योगी सरकारमध्ये.

दिल्ली दंगलींवर सेवानिवृत्त जजेसचा अहवाल: संघी षडयंत्र पुन्हा उघड!

समितीने हे निदर्शनास आणून दिले की फेब्रुवारी 2020 आणि एप्रिल 2022, दोन्ही हिंसाचारात दिल्ली पोलिसांची वर्तणूक वेगवेगळ्या भूमिका दर्शवणारी होती. अहवालात दिल्ली पोलिस दंगल थांबवण्यात का कमी पडले, या प्रश्नाचे उत्तर 2 वर्ष उलटून देखील पोलीस यंत्रणा देऊ शकली नाही याबाबतदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. दंगलीदरम्यान कित्येक ठिकाणी हे दृश्य देखील पाहायला मिळाले की दंगल रोखण्यात पोलिसांनी पुढाकार तर घेतला नाहीच वरून मुस्लिमांवर हल्ले होत असताना पोलिस असे हल्ले करण्यामध्ये सामील झाले. समितीने दंगलीतील दिल्ली पोलिसी भूमिकेची स्वतंत्र रित्या पडताळणी करण्यासाठी कोर्टाच्या निगराणीत स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झुंझार लढा चालूच

दिल्लीच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन इतिहासाच्या पानांवर कोरले जात आहे. ह्या संघर्षातून जगभरातील कामगार आंदोलने प्रेरणा घेत आहेत

‘हर घर तिरंगा’चे संघ-भाजपचे ढोंग ओळखा!

“हर घर तिरंगा”चा नारा देत घराघरापर्यंत देशभक्तीचे आवतान घेऊन येणाऱ्या मोदी सरकारचा पक्ष, म्हणजे भाजप, ज्या पार्श्वभूमीतून येतो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास तर आज प्रत्येकाने जाणणे आवश्यक आहे. कारण देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारे हे स्वघोषित ठेकेदार स्वतः देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि त्यानंतरही किती “हाडाचे देशभक्त” होते,  तिरंग्याचे “प्रेमी” होते, आणि इंग्रजांचे “विरोधक” होते, याचा इतिहास प्रत्येक भारतीयापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे.

देहविक्रय ‘व्यवसाय’ नाही, पतीत समाजव्यवस्थेचे लक्षण आहे!

देहविक्रय म्हणजेच मानवी शरीराचे ‘माला’मध्ये रूपांतरण हे मानवी शोषणाचं अत्यंत बीभत्स रूप आहे. कोणत्याही व्यक्तीचा शेवटचा ‘किल्ला`, तिच्या सार्वभौम अस्तित्त्वाची शेवटची निशाणी आहे तिचे शरीर. या शरीराची खरेदी-विक्री करण्यास व्यक्ती तेव्हाच तयार होऊ शकते जेव्हा प्रस्थापित समाजाच्या चौकटीत जगणे असह्य बनवले जाईल

‘शक्ती कायद्या’तील बदलांनी खरोखर महिला सुरक्षित होतील का?

शक्ती कायदा एकीकडे महिला अत्याचारांच्या समस्येच्या मुळाशी न जाता फक्त ‘कडक शिक्षेच्या’ तर्कावर आधारित आहे, दुसरीकडे या काद्यातील बऱ्याचशा तरतुदी तर महिलाविरोधी आहेत!

स्त्री विरोधी वाढते अत्याचार

स्त्री विरोधी वाढते अत्याचार पितृसत्ताक समाज आणि भांडवलशाहीच जबाबदार!! अश्विनी गेल्या दोन दशकांपासून स्त्री विरोधी अत्याचार, बलात्कार, हिंसा या सर्व घटनांमध्ये अतोनात वाढ झाली आहे. बलात्कार झाल्यावर मारहाण करून खून…