मोदींची ‘महासत्ता’ करतेय भूकेचे विश्वविक्रम!
‘जागतिक भूक निर्देशांक’(Global Hunger Index) अहवाल दरवर्षी जगभरातील भूक आणि कुपोषणाच्या स्थितीवर प्रसिद्ध केला जातो. वया वर्षीच्या आक्टोंबर 2022 मधील अहवालाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जगातील एक मोठा हिस्सा भांडवली लुटीमुळे आणि उपासमारीने त्रस्त आहे. या अहवालानुसार 121देशाच्या यादीत भारत सहा क्रमांकांने घसरून 107 क्रमांकावर आला आहे. तर याच अहवालात हे देखील सांगितले आहे की, नेपाळ (81),बांगलादेश (84), म्यानमार (71)आणि पाकिस्तान (99) भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहेत.