Tag Archives: कविता

कविता – कामगार बंधो! / नामदेव ढसाळ

कामगार बंधो!
ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस
त्या थडग्याचाच ह्या कुत्र्यांना विसर पडलाय

सोमनाथ केंजळे यांच्या दोन कविता

ज्यांच्या कणखर हातांनी
घाव घातले दगडांवर
उभारला संपत्तीसंस्कृतीचा डोलारा
कुणाच्या असण्यावर अन् कुणाच्या नसण्यावर सुद्धा
शेवटचा घाव पडताच
चुकते होतात हिशेब
अॅलिनेट होत बाहेर
फेकली जातात मांण्स

कविता – विदूषक / कविता कृष्णपल्लवी

विदूषक सिंहासनावर बसून
दाखवतो तऱ्हेतऱ्हेच्या करामती
दरबारी हसतात, टाळ्या पिटतात
आणि भ्यायलेले सभ्य नागरिक साथ देतात
त्यांना माहीतीय, विदुषक एक खुनी आहे
आणि दरबारात रक्ताच्या डागावरच
अंथरल्यात लाल पायघड्या
विदूषकाचा आवडता छंद आहे

कविता – फिरून येतील लांडगे / रवि कुमार

फिरून येतील लांडगे
अंधकार त्यांची ताकद आहे
आणि अजूनही दूर झालेला नाही अंधकार
ते येत राहतील उजाडेपर्यंत
दर वेळी अधिक आततायी
अधिक हिंस्र बनून
त्यांचे अधिक हिंस्र बनणेच
त्यांच्या कमकुवत होण्याची खूण असेल…

‘निकारागुआ’चे महाकवी अर्नेस्टो कार्देनाल यांची कविता – सेलफोन

तुम्ही तुमच्या सेलफोनवर बोलता,
बोलता, बोलत राहता
आणि हसता तुमच्या सेलफोनवर,
तो कसा बनला आहे याची काहीच माहिती नसताना,
आणि तो काम कसा करतो याची त्याहूनही कमी माहिती असताना
पण त्याने फरक काय पडतो,
अडचण ही आहे की तुम्हांला माहीत नाही,
जसे माहीत नव्हते मलाही
की कित्येक माणसे कांगोमध्ये मरतात
हजारो हजार
त्या सेलफोनपायी.
कांगोमध्ये मरतात,
त्याच्या डोंगरांमध्ये आहे कोल्टन