Tag Archives: पावेल पराशर

आर.एस.एस.चे ‘गर्भ विज्ञान संस्कार’ – मुर्ख वंशवादी मानसिकतेचे नव-नात्झी संस्करण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वंशवादी अजेंडा, जो त्यांचा राजकीय पूर्वज असलेला जर्मन नात्झी पक्षाचादेखील होता, तो आता प्रत्येकवेळी उघड होताना दिसत आहे. ‘आरोग्य भारती’ या आर.एस.एस.च्या आरोग्य विभागाने ‘गर्भ विज्ञान संस्कार’ नावाने एक प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत गर्भात ‘सर्वश्रेष्ठ अपत्य’ रुजवण्यासाठी(प्राप्तीसाठी). जे दीर्घायुषी आणि गोऱ्या वंशाचं असेल. आई-वडिलांना तीन महिन्यांचा एक अभ्यासक्रम पुर्ण करावा लागतो. या अभ्यासक्रमामध्ये ग्रह ताऱ्यांची दिशा आणि दशा पाहून संभोगाची तारीख व वेळ ठरवली जाते, ज्यामुळं ‘सर्वश्रेष्ठ’ वंशाची मुलं जन्माला येतील. हा प्रकल्प मागील दशकापासून गुजरातमध्ये चालू आहे आणि २०१५ पासून त्याला राष्ट्रीय पातळीवर लागू केलं गेलं आहे. संघाच्याच शिक्षण विभाग असलेल्या ‘विद्या भारती’ च्या मदतीने या प्रकल्पाच्या सध्या १० शाखा गुजरात आणि मध्य प्रदेशात आहेत. लवकरच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील या उपक्रमाच्या प्रसाराच्या योजना आहेत आणि २०२० पर्यंत एक ‘सर्वश्रेष्ठ’ वंश तयार करण्याची परियोजना आहे.

धार्मिक कट्टरतावाद्यांचे आणखी एक भ्याड कृत्य

एक संशोधक, शिक्षणतज्ञ, एक तर्कवादी साहित्यिक आणि बुद्धिजीवी म्हणून त्यांचा जीवनसंघर्ष आणि फासिवाद्यांनी केलेली त्यांची हत्या, फासिवाद्यांना सगळ्यात जास्त कशाचे भय वाटते, याचीच साक्ष देतात. ते तर्काला घाबरतात, विज्ञानाला घाबरतात, संशोधनाला घाबरतात, सत्याच्या शोधाला घाबरतात आणि ज्ञानाला घाबरतात. कलबुर्गींची हत्या म्हणजे तर्कवाद्यांच्या हत्यांच्या साखळीतील आणखी एक हत्या होय. या अगोदर महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अशाच हत्या झालेल्या आहेत. फासिवाद्यांनी सत्तेत आल्यानंतर बिनधोकपणे हत्यांची मालिका सुरू केलेली आहे. कलबुर्गी यांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी बजरंग दलाच्या मेंगळुरू विभागाचे संयोजक भुवित शेट्टी यांनी उघडपणे ट्विटरवर या हत्येचे स्वागत केले व त्याचबरोबर तर्कवादी साहित्यिक एस भगवान यांनासुद्धा जिवे मारण्याची धमकी दिली, यावरून फासिवाद्यांचा सध्याचा बेडरपणा दिसून येतो. स्वतःला संसदेत आणि विधानसभेत भगव्या टोळीच विरोधक म्हणवणाऱ्या काँग्रेसने हिंदुत्त्वाची नवीन प्रयोगशाळा बनलेल्या कर्नाटकबद्दल फक्त सौम्य भूमिका घेतली आहे असे नाही तर त्यांना संरक्षणसुद्धा दिलेले आहे. आज जनतेची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान देशभरात सुरू असताना अभिव्यक्तीचे धोके पत्करणे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी झुंजार संघर्ष उभारणे ही काळाची पहिली मागणी आहे.