भारतीय इतिहास काँग्रेस 2018 रद्द : कारण ते घाबरतात इतिहासाला!
इतिहास कॉंग्रेसला रद्द करणे याच फॅसिस्ट सरकारचे एक पाऊल आहे ज्यांना असा इतिहास हवाय जो त्यांच्या घृणेच्या आणि खोटारडेपणाच्या राजकारणाचा स्वामिभक्त सेवक असेल, असा इतिहास नाही जो स्वातंत्र्याच्या अगोदरच्या त्यांच्या काळ्या कारनाम्यांना उघड करेल, त्यांच्या खोट्या राष्ट्रवादाला ध्वस्त करेल, त्यांच्या फॅसिस्ट-धर्मवादी राजकारणाला विरोध करेल, प्रश्न विचारायला शिकवेल. विज्ञान आधारित तर्कसंगत पद्धतीने विचार करणे या सरकारांसाठी धोकादायक आहे म्हणून ते अशा कोणत्याही स्वतंत्र कॉंगेसला सहन करु शकत नाहीत. अशा सत्तेची ताकद जनतेच्या अज्ञानात निहीत असते, त्यामुळे असे सरकार नेहमीच सत्यशोधनाला विरोध करेल.