अमर हुतात्मा राजगुरू यांच्या १०७ व्या जन्मदिनानिमित्त ‘कामगार बिगुल टीम’ च्या वतीने क्रांतिकारी सलाम!

Rajguruस्वातंत्र्यानंतर क्रांतिकारक हुतात्म्यांच्या विचारांना दाबून टाकण्याचे प्रयत्न सर्व सरकारांनी करून आजसुद्धा जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल अथांग प्रेम व आदर आहे. त्यांचे विचार आजही जनतेचे शोषण करणाऱ्या सरकार व नेत्यांसाठी तितकेच धोकादायक आहेत जितके ते त्यांच्या काळात ब्रिटीश राज्यकर्त्यांसाठी धोकादायक होते. नेमके हेच कारण आहे की वाह्यात जाहिराती आणि भ्रष्टाचारी नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चित्रांनी वर्तमानपत्रांची पानेच्या पाने भरवणाऱ्या मिडियाला मागील महिन्यात अमर हुतात्मा राजगुरुंची जयंती लक्षात राहिली नाही.
पुण्याजवळील खेडेगावात २४ ऑगस्ट १९०८ रोजी जन्मलेले शिवराम हरि राजगुरू वयाच्या केवळ २२व्या वर्षी फाशीच्या तख्तावर गेले. पण ते ज्या स्वप्नांसाठी फाशीच्या तख्तावर गेले ती स्वप्ने आजसुद्धा अपूर्ण आहेत. आजच्या तरुण-तरुणींना त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून हे सिद्ध करावे लागणार आहे की त्यांचे हौतात्म्य व्यर्थ गेलेले नाही. त्यांनी फाशीच्या काही दिवस अगोदरच त्यांच्या एका सहकाऱ्याला सांगितले होते – “मृत्यूला आव्हान देऊनच मी सत्य काय आहे ते जाणले आहे. तुम्हाला काय वाटते की आता शेवटच्या क्षणी मी मृत्युच्या भयाने त्याच्याकडून पराभूत होईन? आणि मी जे काही केले आहे त्याबद्दल जितका अभिमान तुम्हाला आहे, तितकाच अभिमान मला सुद्धा आहे. आपल्या प्राणांची आहुती देऊन ह्या देशातील करोडो तरुण-तरुणींना ह्या स्वर्गाची दारे आपण उघडून दाखवू शकलो तर राहिलेले कार्य ते स्वतःच तडीस नेतील. अश्या सुंदर मृत्यूवर पश्चाताप करणाऱ्याला मूर्खच म्हटले पाहिजे. क्रांतिकारकांसाठी असा मृत्यू म्हणजे इच्छा केलेले वरदान प्राप्त होण्यासारखेच आहे”.

कामगार बिगुल, सप्‍टेंबर २०१५