नाशिक व पुणे येथील दलित विरोधी अत्याचारांच्या विरोधात मंबईत प्रदर्शन
महाराष्ट्रात वाढत चाललेल्या जातीय मोर्चेबांधणीचे आणखी एक उदाहरण अलीकडेच नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीशी छेडछाडीच्या प्रकरणानंतर दलित वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. स्टीकरां पाहून वाहने निवडून जाळण्यात आली. आठ गावांमध्ये दलितांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात ३० हून अधिक माणसे जखमी झाली. गंभीर जखमी कित्येक दिवस मुंबई आणि नाशिकच्या इस्पितळांमध्ये भरती होते. या एकूण प्रकऱणात पोलीस आणि प्रशासनाने मूक दर्शकांची भूमिका घेतली. या घटनेच्या विरोधात १७ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय जाती विरोधी मंच आणि नौजवान भारत सभा या संघटनांनी लल्लूभाई कंपाउंड मानखुर्दच्या मुख्य चौकात निषेध सभेचे आयोजन केले.
कामगार बिगुल, डिसेंबर २०१६