पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ मध्ये फी वाढीचा विरोध करणाऱ्यां विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ६६ विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा.

महाग होत चाललेल्या शिक्षणाबाबत सरकारला जेव्हा जेव्हा जाब विचारण्यासाठी आंदोलन व विरोध केला जातो तेव्हा तेव्हा सरकार सगळ्या मुखवट्यांना काढून ठेवत दडपशाही करतं. हेच ११ एप्रिल रोजी चंडीगढ मधल्या पंजाब विश्वविद्यालयात झालं. या विश्वविद्यालयातल्या सगळ्या कोर्सेजची फी अनेक पटींनी वाढवली गेली, जसे बी-फार्मा ची फी ५०८० वरून ५०००० केली गेली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने आयोजीत केली होती.त्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.वीसी ला भेटण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सुरूवातीला तर वाटर कॅनान ने पाण्याचा मारा केला, नंतर अतिशय रानटीपणे लाठीचार्ज केला.त्यानंतर ६६ विद्यार्थ्यांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यासहीत अनेक कलमं लावण्यात आली आहेत. अनेकांना अटक केली आहे. फीविरोधी आंदोलन करणाऱ्यांवर देशद्रोहाचे कलम लावण्याच्या विरोधात जेव्हा चहुबाजूंनी पोलिसांवर दबाव वाढू लागला तेव्हा ते कलम काढले गेले. अजूनही विद्यार्थ्यांचा संघर्ष ठामपणे चालूच आहे. विद्यार्थ्यांना जामीन मिळालाय. ही बातमी लिही पर्यंत तरी अजून फी वाढ मागे घेतली नव्हती.

कामगार बिगुल, एप्रिल २०१७