आर.एस.एस.चे ‘गर्भ विज्ञान संस्कार’ – मुर्ख वंशवादी मानसिकतेचे नव-नात्झी संस्करण
डॉ. पावेल पराशर
अनुवाद : बबन ठोके
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वंशवादी अजेंडा, जो त्यांचा राजकीय पूर्वज असलेला जर्मन नात्झी पक्षाचादेखील होता, तो आता प्रत्येकवेळी उघड होताना दिसत आहे. ‘आरोग्य भारती’ या आर.एस.एस.च्या आरोग्य विभागाने ‘गर्भ विज्ञान संस्कार’ नावाने एक प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत गर्भात ‘सर्वश्रेष्ठ अपत्य’ रुजवण्यासाठी(प्राप्तीसाठी). जे दीर्घायुषी आणि गोऱ्या वंशाचं असेल. आई-वडिलांना तीन महिन्यांचा एक अभ्यासक्रम पुर्ण करावा लागतो. या अभ्यासक्रमामध्ये ग्रह ताऱ्यांची दिशा आणि दशा पाहून संभोगाची तारीख व वेळ ठरवली जाते, ज्यामुळं ‘सर्वश्रेष्ठ’ वंशाची मुलं जन्माला येतील. हा प्रकल्प मागील दशकापासून गुजरातमध्ये चालू आहे आणि २०१५ पासून त्याला राष्ट्रीय पातळीवर लागू केलं गेलं आहे. संघाच्याच शिक्षण विभाग असलेल्या ‘विद्या भारती’ च्या मदतीने या प्रकल्पाच्या सध्या १० शाखा गुजरात आणि मध्य प्रदेशात आहेत. लवकरच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील या उपक्रमाच्या प्रसाराच्या योजना आहेत आणि २०२० पर्यंत एक ‘सर्वश्रेष्ठ’ वंश तयार करण्याची परियोजना आहे.
हा प्रकल्प म्हणजे अज्ञान आणि मूर्खपणाचं अद्वितीय उदाहरण आहे. प्रकल्पातील अवैज्ञानिक गोष्टीवर नंतर चर्चा करू. सध्या ‘सर्वश्रेष्ठ’ वंश तयार करण्याच्या मानसिकतेवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. ही संकल्पना संघाचे राजकीय पूर्वज असलेल्या जर्मन नात्झींच्या ‘वंश शुद्धी’ या फॅसिस्ट सिद्धांतावरून उधार घेतलेली आहे.
हिटलरच्या काळात नात्झी पक्षाने वंशभेदी वैमनस्याचा प्रचार केला. आर्य वंश ‘सर्वश्रेष्ठ’ वंश स्थापित करण्यासाठी इतर सर्व (यहूदी/ज्यू, काळ्या आणि सावळ्या रंगाच्या लोक) वंशाच्या लोकांना नीच दर्जाचं आणि अशुद्ध रक्ताचे दाखवून/ठरवून विषमतेचा/तुच्छतेचा प्रसार केला. तथाकथित ‘सर्वश्रेष्ठ’ आर्य वंशाच्या शुद्धतेला जपण्यासाठी हिटलरच्या नेतृत्वामध्ये नात्झींनी अशाच प्रकारे मूर्खतापूर्ण आणि अमानवीय वैज्ञानिक प्रयोगांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. जोसेफ मेंजेल नावाचा डॉक्टरच्या रूपातला एक नात्झी हत्यारा होता, ज्याला नात्झींनी ‘औश्विट्ज़’ छळ छावणीचा मुख्य डॉक्टर म्हणून नियुक्त केलं होतं. या छळ छावण्यांमधील कुणाला श्रमासाठी पाठवायचं आणि कुणाला गॅस चेंबरमध्ये मरण्यासाठी टाकायचं हे ठरवण्याचं काम त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. यासोबातच तो जर्मनीतील आर्य वंशाला अधिक प्रगत करण्याचं शोधकार्यही करत होता. या रक्तपिपासू डॉक्टरने छळ छावण्यांमधील ३००० लहान मुलांवर अतिशय वेदनादायी प्रयोग केले ज्यापैकी केवळ २०० मुलंच जिवंत राहिली होती.
आपल्या वंशवादी आणि वर्णद्वेषी मानसिकतेचा नमुना नुकताच काही दिवसांपूर्वी बीजेपी नेता व आरएसएसच्या ‘पांचजन्य’ साप्ताहिकाचे माजी संपादक तरुण विजय यांनी दक्षिण भारतीय लोकांबद्दल बोलताना वर्णद्वेषी वक्तव्यातून दाखवून दिला आहे.
आपल्या देशातील फॅसिस्ट संघी मूर्खपणामध्ये तर नात्झींपेक्षा दोन पावलं पुढंच आहेत. हे अशिक्षित, मूर्ख आणि प्रतिगामी आहेत यात काहीच शंका नाही. परंतू ही वंशवादी विचारधारा जी त्यांच्या नसानसात भिनली आहे त्याचा नंगानाच २१ व्या शतकातही हे स्वदेशी फॅसिस्ट निर्लज्जपणे करत आहेत. खरंतर यांच्या या ‘गर्भ विज्ञान संस्कारा’ला वैज्ञानिक असा कोणताच आधार नाही. परंतू खऱ्या अर्थाने ‘सर्वश्रेष्ठ संतती’ म्हणजेच आरोग्यपूर्ण मुलांबद्दल बोलायचंच झालं तर यांच्या सरकारनं दूरपर्यंत कोणताही उपक्रम हाती घेतलेला दिसत नाही. प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकातील आरोग्यावरचा खर्च कमी करत चालेलेलं मोदी सरकार प्रसुती दरम्यान होणारे मातांचे मृत्यू, आई आणि बाळाचं होणारं कुपोषण यांच्या आकडेवारीत भारत हा सर्वात शेवटच्या रांगेत उभा आहे याकडं निर्लज्जपणे डोळेझाक करत आहे. सरकारी आकड्यानुसार देशातील ७५% आयांना पौष्टिक जेवण मिळत नाही. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, यू.एन.एफ.पी.ए. आणि जागतिक बँकेच्या ‘मैटर्नल मॉर्टेलिटी रिपोर्ट’२००७ नुसार जगभरामध्ये गरोदरपणात किंवा प्रसूतीच्यावेळी ५.३६ लाख स्त्रीयांचा मृत्यू होतो. यातील १.१७ लाख महिलांचे मृत्यू केवळ भारतात होतात. भारतात प्रसूतीच्यावेळी १ लाखापैकी ४५० स्त्रीयांचा मृत्यू होतो. गरोदरपणात आणि प्रसूतीच्यावेळी होणाऱ्या मृत्यूंपैकी ४७% मृत्यू हे रक्ताच्या कमतरतेमुळं आणि अधिक रक्तस्त्रावामुळं होतात.
अशावेळी खरंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करणं, सुरक्षित प्रसूतीसाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं आणि सरकारी इस्पितळांमध्ये प्रसूतीसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याऐवजी ग्रह-ताऱ्यांच्या आधारावर संभोग आणि गर्भधारणेची वेळ निश्चित करणाऱ्या अवैज्ञानिक आणि मूर्ख उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जातय. ही अतिशय हिडीस प्रवृत्ती आहे जिचा खरंतर विरोध केला गेला पाहिजे. सोबतच अशा मानसिकतेचा देखील विरोध केला पाहिजे जी वर्णद्वेषी मानसिकतेच्या दुष्परिणामांमुळं माणसाच्या स्वाभाविक गुणांना दुय्यम दर्जाचं ठरवून कोकिळेसारखा आवाज, चित्त्यासारखी चाल आणि कुत्र्यासारखी निष्ठा असणारी ‘सर्वश्रेष्ठ’ वंश जन्माला घालण्याची महत्वाकांक्षा ठेवते.
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१७
हे संस्कार ते नाझींपासुन शिकले नसुन त्याचा उल्लेख मनुस्मृतीत आहे . गोळवलकरानि ते Bunche of thoughts मधे लिहले आहे .म्हणजे ते विचार मुळचे इथलेच आहेत.