ऑटोनियम कंपनीच्या कामगारांचा संघर्ष आणि वाढते आव्हान
बिगुल पत्रकार
बहरोड (जिल्हा निमराणा, राजस्थान) येथील ऑटोनियम कंपनीच्या कामगारांचा कामावरून काढणे, सक्तीने बदल्या, खोटे खटले आणि धमक्यांचा विरोधात संघर्ष 2019 सालापासून चालू आहे. यावेळी मार्च च्या सुरुवातीलाच कंपनीच्या परमनंट युनियनचे उपाध्यक्ष योगिंदर यादव यांनी कंपनीच्या गेट वर स्वत:वर पेट्रोल ओतले, पेट्रोल पिले आणि बेशुद्ध झाले. त्यांना आणीबाणीच्या स्थितीत आय.सी.यु. मध्ये भरती करावे लागले. योगिंदर यादव यामुळे त्रस्ट होते की कंपनीद्वारे सतत युनियन तोडण्याचे आणि मागण्या ना मानता अनावश्यक बदल्यांचे सत्र चालू होते.
ही युनियन सिटू अंतर्गत येते. युनियनचे 32 सदस्य कंपनी परिसरातच हत्यार खाली टाकून संपावर बसले होते. परंतु पोलिसांनी त्यांना धमकावले, दोन मजुरांना ताब्यात घेतले आणि धमकी दिली कि सर्वाना तुरुंगात टाकले जाईल. मजुरांनी कंपनी आवार सोडले आणि ते बाहेर येऊन बसले. यानंतर कंपनीने चार कामगारांना कामावरून काढून टाकले आणि 9 जणांना निलंबित केले. यानंतर 18 जण कामावर हजर झाले. अशाप्रकारे कंपनीने कामगारांचे आंदोलन मोडून काढले. यानंतर कंपनी गेटवर चालू असलेले आंदोलनही मोडीत काढले गेले.
या अगोदर गेट चालू असलेल्या आंदोलनाला डायकिन आणि रुचीस बियर, टी जी मिंडा या कंपन्यांमधून काढून टाकलेल्या काही कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी पाठींबा दिला होता. परंतु ते सुद्धा कामगारांच्या इतका थांबवू शकले नाहीत. ऑटोनियम एकता कामगार युनियन द्वारे कामगार आयुक्त, पोलीस इत्यादीना निवेदन तर दिले गेले आहे परंतु कामगार कार्यालयाने फक्त दिखावाच केला आहे आणि कामगारांना खोटी आश्वासने दिलीत पण कंपनीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
इतिहासात थोडे मागे वळून पाहिले तर दिसेल की 2019 मध्ये कंपनीने 33 ठेकेदारी कामगारांना कामावरून काढले होते. परंतु त्यावेळी कायम कामगारांनी त्यांच्या समर्थानात टूल डाऊन (हत्यार खाली ठेवून) आंदोलन न केल्याची सल ठेकेदारी कामगार बाळगून आहेत. युनियन ने त्यावेळी फक्त तक्रार नोंदवण्याचे काम केले. कारखान्यात असलेल्या बी.एम.एस. च्या दुसऱ्या युनियनने सुद्धा ठेकेदारी कामगारांचे समर्थन केले नव्हते. परिणाम आहे कि आता 100 च्या आसपास संख्येने असलेले ठेकेदारी कामगार युनियन पासून दूर झाले आहेत. कामगारांमध्ये असलेल्या या फुटीचा फायदा कंपनीला नक्कीच होत आहे.
या अनुभवातून आपण शिकले पाहिजे कि कंपनीच्या स्तरावर कायम आणि ठेकेदारी/तापुरत्या कामगारांमध्ये एकता तर आवश्यक आहेच, परंतु एक मालक नाही, तर संपूर्ण मालक वर्गाविरोधात शक्ती संघटित करण्यासाठी उद्योगाच्या स्तरावर कामगारांनी एका युनियन मध्ये संघटित होणे आवश्यक झाले आहे. सिटू सारख्या केंद्रीय युनियन आता फक्त पगार, बोनस भत्ते यापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. खऱ्या अर्थाने कामगार वर्गीय राजकारणांशी जोडलेल्या युनियन बनवणे आपली गरज बनली आहे.
कामगार बिगुल, एप्रिल 2021