मानखुर्द (मुंबई) येथे शहीद भगतसिंह पुस्तकालयाचे उद्घाटन
शहीद भगतसिंहांच्या १०८ व्या जन्मदिनानिमित्त मानखुर्द येथे नौजवान भारत सभातर्फे शहीद भगसिंह पुस्तकालय सुरू करण्यात आले. पुस्तकालयाच्या उद्घाटन प्रसंगी लहान मुले, तरुण आणि बजुर्ग मंडळी उपस्थित होती. वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांचे विद्यार्थीसुद्धा यावेळी उपस्थित होते.
नौभासच्या नारायणने सांगितले की आपल्या समृद्ध देशातील बहुसंख्य जनता आजसुद्धा गरीबी, बेरोजगारी आणि भुकेची बळी ठरते आहे कारण संसाधनांवर काही मूठभर भांडवलदार मांड ठोकून बसले आहेत. ते आपल्या नफ्यासाठी कष्टकऱ्यांना दिवसरात्र राबवत असतात. आज टीव्ही, सिनेमा उद्योग, इंटरनेटपासून सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे लहान मुले व तरुणांना स्वार्थी, हिंसक आणि विकृत बनवणाऱ्या गोष्टी मनोरंजनाच्या नावाखाली देत आहेत. यामुळे समाजात वेगवेगळ्या विकृती, अंधविश्वास पसरत आहेत. या नफेखोर व्यवस्थेला पर्याय उभा करण्याच्या दीर्घ लढ्यासाठी तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि समृद्ध असणे गरजेचे आहे. निरोगी मनोरंजनाबरोबरच लहान मुले व तरुणांमध्ये उच्च जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. म्हणूनच , वैज्ञानिक विचार देणारी तसेच सामान्य लोकांच्या आयुष्याचे वास्तव व परिवर्तनाचा मार्ग यांच्याशी वाचकांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे.
पुस्तकालयात वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्याबरोबर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील देशविदेशातील विख्यात लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी, त्यांच्या कल्पनांना वाव देणाऱ्या विशेष पुस्तकांचा वेगळा विभागही आहे.
कामगार बिगुल, नॉव्हेंबर २०१५
28 सितम्बर 2015, मुंबई। शहीद भगतसिंह के 108वें जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा की तरफ से मुंबई के मानखुर्द (लल्लू…
Posted by नौजवान भारत सभा on Monday, September 28, 2015