उठाव झेंडा बंडाचां
अमरशेख
उठाव झेंडा बंडाचा
झेंडा आपुल्या रक्ताचा
कामगार स्वातंत्र्याचा
शेतकरी स्वातंत्र्याचा
लाल,लाल,लाल,झेंडा क्रांतीचा
पिऊ पिऊनी रक्त आपले
फार माजली भांडवलशाही
उखडून दया तिला एकदम
सुरू करा मोहीम आपुली
भूक भूक आरोळी ठोकुनी
कामगार संपावर जाती
शांत तयांना करण्यासाठी
गोळ्या चारी भांडवलशाही
पाठीवरती पोट बांधुनि
कित्येक फिरती कामासाठी
पोरे बेकारांची मरती
मरोत भांडवलवाले म्हणती
आता मागे हटणे नाही
तहनाम्याच्या बाता नाही
पुढेच घुसणे ठरली नीती
आपुली एकी अंतिम शक्ती
कामगार बिगुल, जानेवारी 2020