कविता

(स्त्री मुक्ती लीग च्या पोस्टर वरून साभार)

कुठून पैदा होतात
बलात्कारी
खूनी, लंपट
अमानवीय
पशुवत जीव !

भांडवली
सभ्यता-संस्कृतीचे
वारस आहेत हे
विखारी नाग.
स्त्री विरोधी प्रथा परंपरांच्या
कडेकपारीत हे लपून राहतात,
जगतात रुग्ण संस्कृतीच्या
नशिल्या खुराकावर
लोभ-नफ्याची संस्कृती आणि
आंधळी स्पर्धा
यांच्या विषाला मारक बनवते.

सामान्य लोकांचा भ्याडपणा
आणि तटस्थता
यांची हिंमत वाढवतो,
स्त्री शरिराला उपभोग्य वस्तू
बनवणारा मनोरंजन उद्योग
यांचा उन्माद वाढवतो.

नक्कीच या विखारी नागांचा
फणा चिरडावाच लागेल
पण तेवढे पुरेसे नसेल.
त्यांना प्रत्येक क्षणी जन्म देणाऱ्या
मानवद्रोही सामाजिक व्यवस्थेच्या
आणि तिच्या रुग्ण संस्कृतीच्या
विरोधात
एक दीर्घ, निर्णायक लढाई
लढावीच लागेल
प्रतिगामी रूढी-परंपरांची
पाळंमुळं खणावी लागतील
आणि सभ्यतेच्या आड लपणाऱ्या
भ्याड आणि तटस्थ लोकांच्या
डोळ्यांसमोर उभे करावे लागतील
काही ज्वलंत प्रश्नचिन्ह